Advertisement

मुंबई : जुहू चौपाटीवर गणपती विसर्जनाच्या वेळी तरुणाचा मृत्यू

गणपती विसर्जनासाठी आलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हसन युसूफ शेख (१६) पोलिसांना मदत करत होता.

मुंबई : जुहू चौपाटीवर गणपती विसर्जनाच्या वेळी तरुणाचा मृत्यू
SHARES

मुंबईतील चौपाटीचा परिसर गुरुवारी गर्दीने फुलून गेला आहे. बाप्पाच्या विसर्जनाला पावसानेही हजेरी लावली आहे. मुंबईतील अनेक भागांत विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे.

मुंबईत विसर्जनाच्या दिवशीच एक दुर्घटना घडली आहे. मुंबईच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी तैनात असलेल्या एका तरुणावर वीज पडल्याची दुर्घटना घडली आहे. या तरुणाचा कूपर रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

तरुणावर वीज कोसळल्याची घटना घडल्यानंतर त्याला लगेचच रुग्णवाहिकेतून विले पार्लेयेथील कूपर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होती. मात्र तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. या तरुणाला विसर्जनासाठी जुहू चौपाटीवर गुरुवारी तैनात करण्यात आले होते. दुपारपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाल्यानंतर वीज कोसळल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येतेय.

बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांना वरुणदेवाने हजेरी लावली होती. मुंबईतील काही भागांत दुपारीच अंधारुन आले होते. अनेक भागात विजांच्या कडाकडाटासह पावसाने सुरुवात केली होती. 

हवामान विभागाकडून पुढील 24 तास महत्त्वाचे असण्याचे सांगण्यात आले आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, कर्नाटक गोवा आणि केरळ किनारपट्टीवर काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.




हेही वाचा

250 आश्रमशाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा