Advertisement

रात्रभर पावसाची बॅटिंग, हवामान खात्याकडून 5 दिवसाचा इशारा

वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे देखील पडली आहेत. तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे देखील उडून गेली आहेत.

रात्रभर पावसाची बॅटिंग, हवामान खात्याकडून 5 दिवसाचा इशारा
SHARES

राज्याच्या विविध भागात अवकाळी पावासाने धुमाकूळ घातला आहे. मध्यरात्री मुंबईतही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह मुंबईत पाऊस झाला.

वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे देखील पडली आहेत. तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे देखील उडून गेली आहेत.

मुंबईच्या सर्वच भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस झाला. यामध्ये अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, विलेपार्ले परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर मुंबई एअरपोर्ट परिसरात देखील वादळी पाऊस झालाय.

प्रादेशिक हवामान केंद्र (RMC) मुंबईने गुरुवारी देखील शहरात अंशतः ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईतील सर्वात कमी तापमान 25 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे तर आज सर्वाधिक तापमान 38 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

RMC मुंबईने शुक्रवार, 14 एप्रिलपर्यंत मुंबईत अंशतः ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शहरातील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 36 अंश आणि 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

शनिवार आणि रविवारी (15 आणि 16 एप्रिल) शहरात मुख्यतः निरभ्र आकाश दिसण्याची शक्यता आहे. तथापि, येत्या सोमवारी, 17 एप्रिल रोजी अंशतः ढगाळ आकाश मुंबईत परतेल.

शहरातील कमाल तापमान तीनही दिवस ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता असताना सोमवारी किमान तापमान एक ते दोन अंशांनी घसरून २३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याकडून पुन्हा एकदा राज्याला पावसाचा इशारा दिला आहे. पुढील ५ दिवसांत कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाट/विजांच्या कडकडाटासह हलका / मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १२ ते १४ या कालावधीत मध्य महाराष्ट्रात गारपिटीची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर १३ एप्रिल रोजी कोकणात आणि १४ एप्रिल रोजी मराठवाड्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा