Advertisement

मुंबईतील 7 धरणात फक्त 10.67 टक्के पाणीसाठा

मुंबईकरांना येत्या काही दिवसांत पाणी कपातीचा सामना करावा लागू शकतो.

मुंबईतील 7 धरणात फक्त 10.67 टक्के पाणीसाठा
SHARES

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे. त्यामुळे मुंबईकरांचे पाण्यासाठी हाल होणार असल्याची शक्यता आहे. 

मुंबईला पाठीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाठीसाठा कमी झाला आहे. सात धरणात केवळ 10 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळेच पुढच्या महिन्यात पाणी कपात होऊ शकते. मुंबईतील पाणीसाठा अडीच लाख दक्षलक्ष आहे. तरीही पावसावर अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे प्रशासन पाणीकपातीचा निर्णय घेऊ शकतात.

रिपोर्टनुसार, प्रशासन येत्या दोन दिवसात मुंबईतील पाणीसाठ्याचा आढावा घेणार आहे. त्यात पाणीकपातीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणात फक्त 10.67 टक्के पाणी साठा आहे. या सातही धरणांचा एकत्र मिळून 1 लाख 54 हजार 471 दक्षलक्ष लिटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात हाच पाणीसाठा 16.43 टक्के होता. हा आकडा आता कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो.

सध्या उन्हाळा खूप वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. याचसोबत उन्हामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात वाफ होते. याचा परिणाम पाणीसाठ्यावर होतो. तसेच जून महिन्यात आवश्यक तितका पाऊस पडत नाही. त्यामुळेच हा पाणीसाठी जुलै महिन्यापर्यंत पुरवावा लागणार आहे. यंदा पाऊस वेळेवर पडला तरच पाणीकपातीचे संकट दूर होऊ शकते.



हेही वाचा

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग 23 मे रोजी 1 तासासाठी बंद

4 जूनला मुंबईत संपूर्ण दिवस दारुबंदी नको

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा