Advertisement

मुंबईत 'या' दोन दिवशी पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद

या दोन तारखेला 24 तास तासांसाठी पाणी येणार नाही आहे.

मुंबईत 'या' दोन दिवशी पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद
SHARES

मुंबईकरांना दोन दिवस पाणीकपातीचा (Mumbai Water Supply) सामना करावा लागणार आहे. 30 आणि 31 जानेवारीला मुंबईतील काही भागात नळांना पाणी येणार नाही आहे. त्यामुळे या तारख्या लक्षात ठेवा अन्यथा वेळेवर तुमची तारांबळ उडेल. या दोन तारखेला 24 तास तासांसाठी पाणी येणार नाही आहे. 

पाण्याचा 'मेगाब्लॉक'!

मुंबई पालिकेकडून सांगण्यात आलं आहे की, भांडुप संकुलमधील जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनी जोडण्याचं काम केलं जाणार आहे. अतिरिक्त 4,000 मिलिमीटर व्यासाची जी जलवाहिनी ती तोडणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना दोन दिवस पाणीकपातीचं संकट असणार आहे.

याशिवाय भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जल वाहिन्यांवर 2 ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे आणि 2 ठिकाणी उद्भवलेली गळतीबाबत काम केलं जाणार आहे. 

31 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत काही विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने येणार आहे. मुंबईतील नेमक्या कुठल्या विभागात पाणीपुरवठा होणार नाही ते जाणून घेऊयात. 

पश्चिम उपनगर 

के पूर्व
के पश्चिम
पी दक्षिण
पी उत्तर
आर दक्षिण
आर मध्य
आर उत्तर
एच पूर्व
एच पश्चिम 

पूर्व उपनगर

एस विभाग
एन विभाग
एल विभाग



हेही वाचा

Exclusive: K/E वॉर्डमधील डिजिटल होर्डिंगच्या तक्रारीची पालिकेकडून दखल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा