Advertisement

Exclusive: K/E वॉर्डमधील डिजिटल होर्डिंगच्या तक्रारीची पालिकेकडून दखल

जाहिरात एजन्सीने डिजिटल होर्डिंगची लाईटची दाहकता कमी केली.

Exclusive:  K/E वॉर्डमधील डिजिटल होर्डिंगच्या तक्रारीची पालिकेकडून दखल
SHARES

अंधेरी पूर्वेतील पंप हाऊस सबवे जंक्शनवर ठेवलेल्या डिजिटल होर्डिंगचा प्रवाशांवर कसा परिणाम होत आहे हे मुंबई लाईव्हने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आणि प्रवाशांसाठी ते किती धोकादायक आहे याची माहिती आम्ही प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. 

शेवटी, पालिकेच्या वॉर्ड K/E ने मुंबई लाईव्हच्या बातमीची दखल घेतली आणि जाहिरातदारांना त्याच भागातील होर्डिंग आणि इतर होर्डिंगची लाईट कमी करण्यासाठी पत्र लिहिले. डिजिटल होर्डिंग कसे लावावेत यासंबंधीचे नियम या पत्रात आहेत.

  

आमची पत्रकार रुपाली शिंदे यांनी १९ जानेवारीला पालिकेकडे यासंदर्भात तक्रार करताना एक व्हिडिओ शेअर केला होता. पालिकेने याच बातमीची दखल घेत डिजिटल होर्डिंग्सची लाईट कमी केली आहे. सध्या करण्यात आलेले बदल याचा देखील व्हिडिओ आम्ही शेअर करत आहोत. जेणेकरून लोकांना यातील फरक कळेल. खालील व्हिडिओ आम्ही 23 जानेवारी रोजी शूट केला आहे.

खाली दिलेला डिजिटल होर्डिंगचा जूना व्हिडिओ आम्ही शूट केला होता. ज्यामध्ये डोळ्यांवर खूप उजेड येत असल्याची तक्रार अनेकांनी केली होती. 


SoilArmy नावाच्या वापरकर्त्याने सांगितले की त्याला डिस्लेक्सिया आहे आणि त्याने अधिकाऱ्यांना डिजिटल होर्डिंगची लाईट कमी करण्याची विनंती केली.  



हेही वाचा

आता बोअरवेल खोदण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक

गोरेगाव, कांदिवलीतल्या 2 उड्डाणपुलांखालील जागेचा होणार मेकओव्हर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा