Advertisement

साथीचे आजार जनतेमुळेच : शिवसेनेने जनतेवर फोडले खापर


साथीचे आजार जनतेमुळेच : शिवसेनेने जनतेवर फोडले खापर
SHARES

मुंबईत साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत असून मलेरिया, डेंग्यू,काविळ, लेफ्टोस्पायरेसी, ताप आणि अतिसाराच्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढतच जात आहे. परंतु हे साथीचे आजार नियंत्रणात आणण्यास महापालिका प्रशासनाची यंत्रणा अपयशी ठरत आहे. प्रशासनाचा हा कामचुकारपणावर सर्वपक्षीय नगरसेवक लक्ष वेधत असतानाच शिवसेनेच्या नगरसेवकांनी मात्र, साथीच्या आजारांना जनताच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. जनतेच्या निष्काळजीपणामुळेच हे आजार पसरत असल्याचे सांगत या साथीच्या आजारांचे खापर जनतेवर फोडले आहे.


उपाययोजना काय?

मुंबईत साथीच्या आजारांबाबत प्रशासन उदासीन असून स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात 'आयसोलेशन वाॅर्ड' म्हणून विशेष कक्ष स्थापन करण्याची मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यामार्फत कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याचे सविस्तर निवेदन महापालिका आयुक्तांनी सभागृहात करावे, अशीही त्यांनी सूचना केली.


शिवसेनेच्या नगरसेवकांचा डराव डराव

विरोधी पक्षनेत्यांच्या निवेदनाला शिवसेनेच्या  किशोरी पेडणेकर यांनी पाठिंबा दिला तर शितल म्हात्रे आणि राजुल पटेल यांनी विरोध दर्शवला. उलट हे साथीचे आजार जनतेमुळेच होत असल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला. पावसाळा आला की बेडूक डराव डराव करायला लागतात. तसेच पावसाळा आला की साथीच्या आजारांवर विरोधी पक्षनेते निवेदन करतात,असा आरोप त्यांनी केला. आमच्या पक्षाने चार दिवसांपूर्वीच आरोग्य विषयावर कार्यशाळा घेऊन साथीच्या आजारांची माहिती नगरसेवकांना दिली असे सांगत मुंबईत आरोग्य व्यवस्था ठणठणीत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला.


स्वाईन फ्लूची औषधेच नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी साथीच्या आजारांच्या रुग्णांवर प्राथमिक उपचार राबवणे हेच आवश्यक असल्याचे सांगितले. परंतु मुळातच हीच सुरक्षित उपचार यंत्रणा राबवली जात नसल्याचे सांगत अनेक दवाखान्यांमध्ये एन१एन१च्या आजाराची लसच उपलब्ध नसल्याचे सांगितले. याला शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, काँग्रेसच्या तुलिप मिरांडा, अश्रफ आझमी, कमलेश यादव, वणू आदींनी दुजोरा देत ही लस त्वरीत उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत सपाचे रईस शेख आदींनी भाग घेतला होता. प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी साथीच्या आजारांच्या रुग्णांची माहिती सभागृहाला देत आरोग्य विभाग यासाठी जनजागृती करत असल्याचे सांगितले. याबाबत साथीच्या आजारांबाबतच्या उपाययोजनांची माहितीही देण्यात आली.



हे देखील वाचा - 

खाजवून खाजवून मुंबईकर बेहाल, नायटा, गजकर्णाचे रुग्ण चौपट



 डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा