Advertisement

खाजवून खाजवून मुंबईकर बेहाल, नायटा, गजकर्णाचे रुग्ण चौपट


खाजवून खाजवून मुंबईकर बेहाल, नायटा, गजकर्णाचे रुग्ण चौपट
SHARES

मुंबईतटीबी, डेंग्यू, मलेरिया अशा साथीच्या आजारांनी कहर केलेला असतानाच गजकर्ण आणि नायट्याच्या खाजेने मुंबईकर बेहाल झाले आहेत. साथीचे असेही काही आजार आहेत, खासकरून त्वचारोग ज्याबद्दल रुग्ण उघडपणे बोलण्याचे टाळतात. पण या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास प्रचंड त्रासही सहन करावा लागतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन वर्षात अंगावर 'फंगस इन्फेक्शन' म्हणजेच 'नायटा' असलेल्या रुग्णांची संख्या चौपटीने वाढली आहे.


१०० पैकी २५ ते ३० रुग्ण

काही वर्षांपूर्वी १०० रुग्णांपैकी ५ ते ६ रुग्ण 'फंगस इन्फेक्शन'चे असायचे. पण, आता दररोज दररोज २५ ते ३० रुग्ण 'फंगस इन्फेक्शन'वर उपचार घेण्यासाठी येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 



ही एक राष्ट्रीय समस्या

पावसाळा सुरू झाला की त्वचेचे रोग होणे हे काही नवे नाही. पण, एकदिवस फंगस इन्फेक्शन ही राष्ट्रीय समस्या होऊ शकते, अशी भीती त्वचारोगतज्तज्ञ डॉ. किरण नाबर यांनी व्यक्त केली आहे.

पावसाळ्यात कपडे ओले असले की त्वचेवर आपोआपच लाल चट्टे पडतात. त्याला आपण 'रॅशेस' असेही म्हणतो. वातावरणात बदल होत असल्याकारणाने पाणी आणि घाम या दोन्ही गोष्टींमुळे त्वचा रोगांच्या प्रमाणात वाढ होते.

पूर्वी हा आजार कुटुंबातील एखाद्यालाच व्हायचा आणि त्यावर योग्य उपचार घेतले की लगेच बराही व्हायचा. पण, आता एकानंतर दुसऱ्याला, दुसऱ्यानंतर तिसऱ्याला अशाप्रकारे एकाच कुटुंबातील सर्वांना या आजाराची लागण होत आहे. म्हणून त्वचारोगतज्ज्ञ हे इंन्फेक्शन पूर्णपणे बरे होईपर्यंत त्याच्यावर उपचार घेण्याच सल्ला देत आहेत.



विषाणू जाईपर्यंत आजार कायम

पूर्वी हा आजार बरा व्हायला जवळपास 2 आठवडे लागायचे. पण, आता औषध, मलम लाऊनही हा आजार लगेच बरा होत नाही. त्याचे डाग जायलाही जवळपास तितकेच महिने जातात. आधी नायटा बरा झाला की पुन्हा येत नव्हता. पण, आता नायट्याचा विषाणू जोपर्यंत त्वचेतून पूर्णपणे जात नाही तोपर्यंत तो तसाच राहतो. त्याची आपल्या पूर्ण शरीराला लागण होते.

फंगस इन्फेक्शनचे बरेच प्रकारचे आहे. अंगाची त्वचा, डोक्यावरील त्वचा येथे विविध प्रकारचा संसर्ग होतो. त्याला वैद्यकीय भाषेत ‘टिनिया’ असे म्हणतात.


नायट्याचे प्रकार

  • गजकर्ण
  • नखांना होणारा बुरशीचा संसर्ग
  • हात, मान, चेहरा, कोपर, पोटावरील त्वचेवर   
  • बोटांच्या बेचक्यात, पोटावर, काखेत तसेच जननेंद्रियांच्या ठिकाणीही या रोगाचा प्रादुर्भाव 
  • शरीराच्या अंतरभागात ही नायटा होऊ शकतो.


नायटा होण्याची लक्षणे

  • त्वचेवर पाण्याचे फोड येतात, त्वचेची आग होते, खाजही येते
  • कपडे घट्ट झालेल्या ठिकाणी खाज येते
  • जांघेतील त्वचा पातळ आणि नाजूक बनते
  • त्वचेवर जखमा होतात
  • स्त्रियांच्या चेहऱ्यावर केस उगवतात
  • चुकीच्या मलमाने चेहऱ्यावर मुरमे येतात 
  • संपर्क येणाऱ्या कुणालाही इंन्फेक्शन होऊ शकते 
  • हवेतील विषाणूमुळेही संसर्ग
  • घरात पाळलेला कुत्रा, मांजर यामुळेही संसर्ग


'फंगस' हा एक विषाणू असल्याने तो आपल्या शरीरावरच वाढतो. म्हणून त्याला 'डरमॅटोफाईट' असेही म्हणतात. म्हणजे फक्त त्वचेला परिणाम करणारे विषाणू.

आता या आजाराचे स्वरूप बदलू लागल्याने महाग बुरशी विरोधक औषध वापरावी लागत आहे. मात्र, ही औषध रूग्णांना दिल्यानंतरही आजार पुन्हा उद्भवतोय. त्यामुळे सध्या रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे.

पालिकेच्या नायर रुग्णालयातही अशा रुग्णांची संख्या अधिक आहे. एका ओपीडीत 300 रुग्णांपैकी नायट्याचे 150 रुग्ण उपचारांसाठी येतात. म्हणजे 50 टक्के रुग्ण फक्त नायट्याच्या उपचारांसाठी येतात.


'फंगस इन्फेक्शन' म्हणजेच 'नायटा' हा संसर्गजन्य रोग आहे. या आजाराच्या उपचारासाठी टिव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या उत्पादनांकडे लक्ष न देता डॉक्टरांकडून उपचार घेणे महत्त्वाचे आहे. आधी हे इन्फेक्शन औषध, मलम लाऊन बरे होत होते. पण, आता हा आजार कायमचा जाण्यासाठी जवळपास 3 ते 4 महिने लागतात. व्यवस्थित आणि योग्य उपचार घेतले तरच नायटा बरा होऊ शकतो आणि मध्येच उपचार थांबवले, तर तो पुन्हा येण्याचीही शक्यता असते.

डॉ. चित्रा नायक, त्वचारोग विभाग प्रमुख, नायर रुग्णालय



नायटा कसा टाळाल?

  • नायटा झालेल्या रुग्णाला वेगळे झोपवा
  • एकच फणी आणि एकमेकांचे कपडे वापरू नका
  • रुग्णांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा 
  • बाह्य उपचारांबरोबरच पोटसुद्धा साफ असणे आवश्यक
  • त्वचा नेहमी कोरडी राहील याची काळजी घ्या
  • वजन जास्त असल्यास मांडीला मांडी घासते व घामने आजार वाढतो
  • त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवा 
  • रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी जांघेत, पोटावर antifungal  पावडर लावा 
  • ओले कपडे जास्त वेळ अंगावर ठेऊ नका


जाहिरातीत दाखवली जाणारी औषधे, मलम स्टेरॉयडची असतात. या औषधाने रूग्णाची खाज लवकर बरी होते. पण, ज्या भागावर हे औषध लावले जाते, त्या भागाची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तसेच हे औषध बंद केल्याने आजार दुपटीने बळावतो. त्यामुळे अशा मलमाचा फायदा होत नाही. त्यामुळे अशा औषधांवर राज्य सरकारने बंदी घालून वेळीच कारवाई करावी. जेणेकरून रूग्णांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही.

- डॉ. किरण नाबर, त्वचारोगतज्ज्ञ




हे देखील वाचा -

साथीचे आजार जनतेमुळेच : शिवसेनेने जनतेवर फोडले खापर


 

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा