Advertisement

मास्क न वापरणाऱ्यांकडून महापालिकेने वसूल केला 'इतका' कोटी दंड

कोरोनाला आळा घालण्यासाठी मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र तरीही अनेक जण मास्कचा वापर योग्यप्रकारे वापरत नाही तर, काही जण मास्कचं वापरत नाही आहेत.

मास्क न वापरणाऱ्यांकडून महापालिकेने वसूल केला 'इतका' कोटी दंड
SHARES

कोरोनाला आळा घालण्यासाठी मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र तरीही अनेक जण मास्कचा वापर योग्यप्रकारे वापरत नाही तर, काही जण मास्कचं वापरत नाही आहेत. याबाबत वारंवार सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. त्यामुळं महापालिकेनं मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांवरील कारवाईदेखील तीव्रतेने राबविली जात आहे. त्यातून, गेल्या वर्षी २२ मार्चपासून ते आतापर्यंत २७ लाख ५८ हजार ६४९ जणांवर कारवाई झाली आहे. त्यातून तब्बल ५५ कोटी ५६ लाखांवर दंड वसूल केला आहे.

मुंबई पालिकेने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तसेच, त्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात गतवर्षी २२ मार्चपासून कारवाई हाती घेतली आहे. पालिकेसह मुंबई पोलिस, रेल्वे मार्गांवरदेखील ही कारवाई हाती घेण्यात येत आहे.

महापालिकेकडून क्लीन अप मार्शलच्या माध्यमातून दंड वसूल केला जात आहे. त्यात, सुरुवातीस एक हजार रु. इतका दंड वसूल केला जात होता. पण नंतर दंडाची रक्कम कमी करून २०० रु. एवढी करण्यात आली.

महापालिका - पालिकेनं आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या २३ लाख ९६ हजार २४९ जणांवर कारवाई केली आहे. त्यातून ४८ कोटी २८ लाख ८० हजार ८०० रु. दंड वसूल केला आहे.

पोलिस - मुंबई पोलिसांच्या कारवाईत ३ लाख ३८ हजार ५०९ जणांवर कारवाई ६ कोटी ७० लाख रु. दंड वसूल केला आहे.

रेल्वे - पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर २३,८९१ जणांवर कारवाई करून ५० लाखांवर दंड वसूल केला आहे.



हेही वाचा - 

मुंबईतील तीन कोविड सेंटर १ जूनपर्यंत बंद, नवीन रुग्णांना प्रवेश नाही

कोरोनातून बरी होऊन बंगळुरुहून मुंबईला परतली दीपिका

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा