Advertisement

नवी मुंबईतील ओएनजीसीच्या प्रकल्पातून रसायन गळती

उरण येथील ऑईल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ONGC) प्रकल्पात रसायन गळती झाल्याची माहिती समोर येत आहे.

नवी मुंबईतील ओएनजीसीच्या प्रकल्पातून रसायन गळती
SHARES

नवी मुंबईतील ओएनजीसीच्या प्रकल्पामध्ये काही दिवसांपूर्वीचं भिषण आग लागली होती. त्यानंतर आता पुन्हा उरण येथील ऑईल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ONGC) प्रकल्पात रसायन गळती झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

नाफ्ता गळती

मिळालेल्या माहितीनुसार, ओएनजीसीच्या एका प्लांटमधून नाफ्ता गळती झाली आहे. त्यामुळं या परिसरात घबराट पसरली असून,  खबरदारीचा उपाय म्हणून प्लांटजवळील गावातील रहिवाशांना तत्काळ स्थलांतर करण्यात आलं आहेओएनजीसी प्लांटमधून रात्रीपासून नाफ्ता रसायनाची ही गळती सुरू झालीही गळती वाढत जाऊन नाफ्ता परिसरातील नाल्यांमधून वाहू लागला आहेसध्या नाफ्ता पुरवठा करणारी पाईपलाइन बंद करण्याता आली आहे.

५ जणांचा बळी

काही दिवसांपूर्वी उरणमधील ओएनजीसीतील एका प्लांटला लागलेल्या आगीत ५ जणांचा बळी गेला होता. ही आगीची घटना नुकताच घडली असल्यानं कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. त्याशिवाय, अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी याबाबत माहिती मिळताच संपूर्ण गाव रिकामं केलं असून, ओएनजीसी प्लांटच्याआजूबाजूचे सर्व मार्ग सुरक्षेच्या दृष्टीनं बंद केले आहेत.



हेही वाचा -

Vidhan Sabha Election 2019: 'या' मोहिमेर्तंगत भाजप साधणार मतदारांशी संपर्क

महापालिकेच्या मोबाइल अ‍ॅपवर खड्ड्यांच्या तक्रारींचा खच



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा