Advertisement

महापालिकेच्या मोबाइल अ‍ॅपवर खड्ड्यांच्या तक्रारींचा खच

महापालिकेच्या या अॅपवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांच्या तक्रारी येत असून दररोज ७० हून अधिक तक्रारी येत असल्याची माहिती समोर आली आहे

महापालिकेच्या मोबाइल अ‍ॅपवर खड्ड्यांच्या तक्रारींचा खच
SHARES

मुंबई आणि उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं मुबईतील रस्तांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे. या खड्ड्यांबाबात अनेकदा महापालिकेला तक्रार करूनही या खड्ड्यांची दुरूस्ती होत नाही आहे. दरम्यान, मुंबईकरांना खड्ड्यांमुळं होणारा त्रासाला सामोरं जावं लागू नये यासाठी महापालिकेनं मोबाईल अॅप तयार केलं आहे. या अॅपवर मुंबईतील खड्ड्यांची तक्रारी दाखल करण्यास सांगितलं आहे. त्यानुसार, महापालिकेच्या या अॅपवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांच्या तक्रारी येत असून दररोज ७० हून अधिक तक्रारी येत असल्याची माहिती समोर आली आहे. 

वॉईज आॅफ सिटिजन

मोबाईल अॅपच्या अगोदर महापालिकेतर्फे २०११ मध्ये वॉईज आॅफ सिटिजन या संकेतस्थळावर खड्ड्यांच्या तक्रारी घेण्यात येत होत्या. मात्र, या संकेतस्थळावर येणाऱ्या खड्ड्यांच्या माहितीमुळं महापालिकेचं पितळ उघं पडत होतं. त्यामुळं महापालिकेनं हे संकेतस्थळ २०१५ मध्ये बंद केलंयानंतर, खड्ड्यांच्या तक्रारीसाठी हेल्पलाइनव्यतिरिक्त कोणतीही यंत्रणा नसल्यानं हे संकेतस्थळ पुन्हा सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती.

मोबाइल अॅप

या मागणीला लक्षात घेत महापालिका प्रशासनानं १९ सप्टेंबर रोजी 'MyBMC Pothole FixIt' नावाचं मोबाइल अॅप लाॅन्च केलं आहेया अ‍ॅप लॉंचकरून अवघे ५ झाले असून, खड्ड्यांच्या सुमारे पावणेचारशे तक्रारी आल्या आहेत. या आकडेवारीनुसार दररोज सरासरी ७०हून अधिक तक्रारी येत आहेत

खड्डे बुजविण्यात अडथळे

महापालिकेकडं तक्रार दाखल केल्यानंतर ४८ तासांमध्ये तो खड्डा बुजविण्याची जबाबदारी ठेकेदार व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. मात्र, पावसाच्या सरी अधूनमधून कायम असल्यानं हे खड्डे तत्काळ बुजविणं आणि पुन्हा न उखडण्याचं आव्हान महापालिके समोर आहे.

अनेक तक्रारी

या अ‍ॅपच्या माध्यमातून खड्ड्यांच्या सर्वाधिक म्हणजे ३४ तक्रारी अंधेरी पूर्व येथून आल्या आहेत. गोरेगाव येथून ३३ आणि कुर्ला येथील ३१ तक्रारींचा यात समावेश आहे. मागील ६ वर्षांच्या कालावधीत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेनं ११६ कोटी रुपये खर्च केले आहेत. तसंच, एक खड्डा भरण्यासाठी सरासरी १७ हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

सांडपाणी प्रक्रियेसाठी महापालिकेतर्फे ७ प्रक्रिया केंद्राची उभारणी

मुंबईतील वाहनांच्या संख्येत 'इतकी' वाढ



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा