Advertisement

नवी मुंबई विमानतळावर 'या' तारखेपासून विमानसेवा सुरू होणार

28 डिसेंबर रोजी व्यावसायिक विमान प्रथमच नवी मुंबई विमानतळावर यशस्वीरित्या उतरले.

नवी मुंबई विमानतळावर 'या' तारखेपासून विमानसेवा सुरू होणार
SHARES

नवी मुंबईकरांची विमान प्रवासाची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर 17 एप्रिल रोजी संपणार आहे. विजय सिंघल यांनी या प्रकरणाची माहिती देत या तारखेपासून प्रवासी आणि मालवाहू (cargo) वाहतूक सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे.

या विमानतळाची क्षमता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दुप्पट असेल. पहिल्या टप्प्यात दरवर्षी 20 दशलक्ष प्रवासी (passanger) प्रवास करतील. टर्मिनल बिल्डिंगचे 84% काम पूर्ण झाल्यामुळे, चारही टर्मिनल स्वयंचलित प्रणालींद्वारे एकमेकांशी जोडलेले आहेत,” असे ते म्हणाले.

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे (Adani Airport Holdings Limited) ग्रुप सीईओ अरुण बन्सल यांनी देखील 17 एप्रिल रोजी लॉन्च झाल्याची माहिती दिली.

“आम्ही नवी मुंबई (navi mumbai) विमानतळाच्या (airport) उद्घाटनासाठी 17 एप्रिल हे उद्दिष्ट ठेवले आहे. एअर परमिट (air permit) मिळाल्यानंतर 70 दिवसांच्या आत उद्घाटन करण्याचे नियोजित केले आहे, जे 6 फेब्रुवारीपर्यंत अपेक्षित आहे,” असे बन्सल यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

28 डिसेंबर रोजी व्यावसायिक विमान प्रथमच नवी मुंबई विमानतळावर यशस्वीरित्या उतरले. यामुळे विमानतळाच्या कामगिरीच्या मूल्यमापनाचा भाग म्हणून टेकऑफ आणि लँडिंग चाचण्या सुरू झाल्या आहेत.

रविवारी दुपारी 1:39 वाजता इंडिगो A-320 विमान दोनपैकी एका धावपट्टीवर यशस्वीरित्या उतरले. नागरी विमान वाहतूक महासंचालक, तंत्रज्ञ आणि विमानातील कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली.



हेही वाचा

मुंबई : शिवाजी पार्कमध्ये एका व्यक्तीची हत्या

म्हाडामध्ये लेखणी बंद आंदोलन

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा