नवी मुंबई (navi mumbai) शहराच्या तुलनेत यंदा मोरबे धरण परिसरात जास्त पाऊस झाला आहे. मोरबे धरण (morbe dam) 93 टक्के भरले आहे. या पावसाळ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाही धरण शंभर टक्के भरण्याची आशा नवी मुंबईकरांना आहे.
पावसाळ्यापूर्वी मोरबे धरणात पाणी कमी असल्याने पालिकेला उन्हाळ्यात विभागांमध्ये पाणीकपात करावी लागली. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.
काही दिवस पावसाने दडी मारली तर सोमवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा सलग काही दिवस पाऊस पडल्यास आणि सुमारे 650 ते 700 मिमी पाऊस झाल्यास धरण 100 टक्के भरण्याची आशा आहे.
15 जूनपर्यंत मोरबे धरण परिसरात केवळ 78.60 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे मोरबे धरणात केवळ 26 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे महापालिका (nmmc) क्षेत्रात पाणीपुरवठा करताना पालिकेने सायंकाळी पाणीपुरवठ्यात आणखी कपात (water cut) केली होती.
मोरबे धरण परिसरात मंगळवार, 20 ऑगस्टपर्यंत एकूण 3005 मिलीमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाऊस होऊनही धरणातील पाणीसाठा कमी आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात यंदा चांगला पाऊस झाला असून, 600 ते 700 मिमी पावसाची संततधार राहिल्यास धरण 100 टक्के भरेल, अशी आशा आहे. सध्या मोरबे धरण 93 टक्क्यांहून अधिक भरले आहे, असे मोरबे धरण प्रकल्पाचे उपअभियंता वसंत पडघन यांनी सांगितले.
हेही वाचा