2023 मध्ये होळीच्या दिवशी घाटकोपरच्या एका जोडप्याचा मृत्यू झाला. या मृत्यूचे कारण अस्पष्ट होते. मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी एफएसएलने (FSL) अहवाल ऑगस्ट 2023 मध्ये राजावाडी रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात परत पाठवला. एका वर्षानंतर, हॉस्पिटलने अंतिम अहवाल जारी केला, ज्यामध्ये मृत्यू गुदमरुन झाल्याचे स्पष्ट केले.
मात्र राजावाडी रुग्णालयातील पोस्टमॉर्टम अहवालात गुदमरून मृत्यू (death) झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, गुदमरल्याचे कारण अहवालात स्पष्ट करण्यात आलेले नाही, असे पंतनगर पोलिसांनी सांगितले.
8 मार्च 2023 रोजी घाटकोपर (ghatkopar) पूर्वेकडील कुकरेजा पॅलेस इमारतीत टीना शाह (38) आणि तिचा पती दीपक (44) यांचे मृतदेह त्यांच्या अपार्टमेंटच्या बाथरूममध्ये आढळून आले. ते जोडपे नुकतेच जुहू येथील होळी पार्टीहून परतले होते.
त्यांना राजावाडी रुग्णालयात (rajawadi hospital) मृत घोषित करण्यात आले होते. नंतर त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता. तसेच मृतदेह पुढील विश्लेषणासाठी कलिना फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) मध्ये पाठवण्यात आले होते.
पोलिसांनी अधिकृतपणे मृत्यूचे प्राथमिक कारण उघड करण्यास नकार दिला. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मृत्यू बाथरूमच्या गिझरमधून गॅस गळतीमुळे किंवा होळीच्या पार्टीदरम्यान भांग खाल्ल्याने झाला असावा संशय व्यक्त केला होता.
विशेष म्हणजे ज्या दिवशी शाह दाम्पत्याचा मृत्यू झाला त्याच दिवशी लखनौ आणि दिल्लीतही अशीच प्रकरणे नोंदवली गेली, जिथे होळीच्या उत्सवानंतर लोकांचा मृत्यू झाला. या प्रकरणांमध्ये, मृतदेह बाथरूममध्ये आढळून आले आणि संबंधित पोलिस विभागांनी बाथरूमच्या गिझरमधून गॅस गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगितले.
पंत नगर येथील पोलीस अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की त्यांनी राजावाडी हॉस्पिटलला अहवाल परत केला आहे आणि गुदमरल्याच्या कारणाबाबत स्पष्टीकरण देण्याची विनंती केली आहे.
"आमच्या तपास आणि अहवालाच्या आधारे खून किंवा विषप्रयोगाचा कोणताही पुरावा नसताना हे अपघाती मृत्यूचे प्रकरण असल्याचे दिसते. तथापि, प्रकरण बंद करण्यासाठी, गुदमरल्याचे कारण स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे.
आम्ही राजावाडी रुग्णालयाच्या माहितीची प्रतीक्षा करत आहोत. ती लवकरच मिळेल," असे पंत नगर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा