Advertisement

मालाड-मालवणीतील नाले भरलेले, राष्ट्रवादी काँग्रेसने नालेसफाईचा बुरखा फाडला!


मालाड-मालवणीतील नाले भरलेले, राष्ट्रवादी काँग्रेसने नालेसफाईचा बुरखा फाडला!
SHARES

मुंबईतील शहर आणि पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आणि महापालिका गटनेत्या राखी जाधव यांनी पश्चिम उपनगरातील नाल्यांची पाहणी केली. यामध्ये मालाड मालवणीतील नाले सफाईच्या कामाला सुरुवातच केली नसल्याची बाब या पाहणीत उघडकीस आली असून नालेसफाई हा केवळ फार्सच असल्याचा आरोप अहिर यांनी केला आहे.


सर्वपक्षीयांकडून नालेसफाईची पाहणी

मुंबईतील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाल्यानंतर सर्वच पक्षांच्या वतीने नालेसफाईच्या कामांची पाहणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही महापालिका अधिकाऱ्यांसह शहर व पूर्व उपनगरातील नाल्यांची पाहणी केली गेली. यामध्ये पाहणी केलेल्या नाल्यांमध्ये कचरा व गाळ जमा झालेला होता. त्यातील नालेसफाईचे काम करण्यातच आले नव्हते.


'पावसाळ्यापूर्वी कामे पूर्णच होणार नाहीत'

मात्र, मंगळवारी पश्चिम उपनगरातील मालाड-मालवणी ६ मधील काही नाल्यांची पाहणी केली असता, तिथेही नालेसफाईच्या कामांना अद्यापही सुरुवात झालेली नसल्याचे समोर आले. अनेक नाले कचरा व गाळाने भरलेले असून त्यावर फुलांचा सडा पडलेला पाहायला मिळाला. तर काही नाल्यांमध्ये पुलाशेजारील कचरा तसाच पडून आहे. त्यालाही अद्याप हात लावलेला नाही, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या भागातील नालेसफाईच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नसून ही कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे पहिल्या पावसाळ्यात हा गाळ वाहून गेल्यानंतर सफाई झाल्याचे दाखवले जाईल. त्यामुळे नालेसफाई हा केवळ फार्सच असल्याचा आरोप सचिन अहिर यांनी केला आहे.



हेही वाचा

मुंबईची तुंबई झाल्यास जबाबदारी 'यांची'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा