Advertisement

मुंबईकरांना पुन्हा एकदा तुंबईला सामोरे जावं लागेल- सचिन अहिर

सचिन अहिर आणि राष्ट्रवादीच्या मुंबई महापालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह पी. एम. जी. पी नाला, शिवाजी नगर-मानखुर्द आणि धारावी माहीम ६० फूट रोडलगतच्या नाल्याची पाहणी केली. या नाल्यातील गाळ काढलाच गेला नसल्याचं यावेळी अहिर यांनी प्रसार माध्यमांना दाखवून दिलं.

मुंबईकरांना पुन्हा एकदा तुंबईला सामोरे जावं लागेल- सचिन अहिर
SHARES

मुंबईतील नाल्यांच्या कामांकडे पाहता ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊ शकत नाही, हे दिसून येत आहे. नालेसफाई योग्य प्रकारे न झाल्यास मुंबईकरांना पुन्हा एकदा तुंबईला सामोरं जावं लागेल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी व्यक्त केली.

सचिन अहिर आणि राष्ट्रवादीच्या मुंबई महापालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह पी. एम. जी. पी नाला, शिवाजी नगर-मानखुर्द आणि धारावी माहीम ६० फूट रोडलगतच्या नाल्याची पाहणी केली. या नाल्यातील गाळ काढलाच गेला नसल्याचं यावेळी अहिर यांनी प्रसार माध्यमांना दाखवून दिलं. हा नाला अजूनही कचरा आणि गाळाने भरलेला, असून इतर नाल्यांची काय स्थिती असेल? असा असा सवाल अहिर यांनी यावेळी केला.नालेसफाईची तक्रार करावी

केवळ २ नाल्यांच्या कामांच्या पाहणीतून नालेसफाई योग्य रितीने होत नसल्याचं दिसून आलं आहे, तर ठिकाणची काय अवस्था असेल. त्यामुळे नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून जिथं जिथं सफाईचं काम झालं नसेल, तेथील सफाईची माहिती पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आणून द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. मोठ्या नाल्यांची सफाई यांत्रिक पद्धतीने केली जाणार असं प्रशासनाने सांगितलं होतं. परंतु प्रत्यक्षात मोठ्या नाल्यांमध्ये कामगार नाल्यात उतरून काम करताना दिसून आले. त्यामुळे नालेसफाईचे काम केवळ नावापुरतेच होत असल्याचा आरोपही अहिर यांनी केला.


महापौरांनी जबाबदारी झटकू नये

महापौर नालेसफाईचं काम योग्यप्रकारे करून घेण्याऐवजी एमएमआरडीएमुळे मुंबई तुंबणार असं विधान करत असतील, तर ते चुकीचं आहे. महापालिकेत शिवसेना सत्तेवर आहे आणि राज्यात त्यांच्या युतीचे सरकार आहे. त्यामुळे त्यांनी ही कामे करून घेण्याऐवजी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दांत अहिर यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. नालेसफाईचे काम योग्य प्रकारे होत नसतानाही पहारेकरी म्हणवणारे वॉचडॉग गेले कुठे? असा सवाल करत त्यांनी भाजपालाही चिमटा काढला.हेही वाचा-

मुंबईची तुंबई झाल्यास जबाबदारी 'यांची'

व्हाॅटस-अॅपद्वारे करा मुंबईतील खड्ड्यांची तक्रारसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा