Advertisement

आर्थिक अडचणीत सापडलेल्या डबेवाल्यांच्या मदतीला धावून आले रोहित पवार

मुंबईतील डबेवाल्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सरसावले आहेत.

आर्थिक अडचणीत सापडलेल्या डबेवाल्यांच्या मदतीला धावून आले रोहित पवार
SHARES

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईतील डबेवाले मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील डबेवाल्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सरसावले आहेत. आमदार रोहित पवार डबेवाल्यांसाठी निधी उभारला आहे.

रोहित पवार यांनी डबेवाल्यांची भेट घेतली. जमा करण्यात आलेला निधी रोहित पवार यांनी त्यांच्या हवाले सुपूर्द केला आहे. 

'मुंबईतील डबेवालेही आज अडचणीत आहेत. काल त्यांना भेटलो. त्यांच्या संघटनेचे सुमारे ५ हजार सदस्य असून, अडचणीतील सदस्यांना मदतीचा हात देता यावा यासाठी त्यांनी एक निधी उभा केलाय. आपल्याच परिवारातील घटक असलेल्या या डबेवाल्यांना मदत करायची तुमची इच्छा असेल तर फोटोवरील नंबरवर संपर्क करावा,' असं आवाहन करणारं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे. मात्र, मुंबईतील चाकरमान्यांना वेळेवर डबा पोहोचवण्याचे काम करणाऱ्या डबेवाल्यांचा व्यवसाय मात्र पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे डबेवाले मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मुंबईतील डबेवाल्यांच्या अडचणी समजून घेत आमदार रोहित पवार यांनी मदत निधी उभा केला आहे. त्याचबरोबर नागरिकांनाही मदतीचं आवाहन केलं आहे.हेही वाचा

नागपाडा इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

महाड दुर्घटना : एकनाथ शिंदेंनी घेतले वाचलेल्या २ मुलांचे पालकत्व

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा