Advertisement

नागपाडा इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

मुंबईतील नागपाडा परिसरातील शुक्लाजी रोडवरील अब्दुल रहमान इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.

नागपाडा इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
SHARES

मुंबईतील नागपाडा परिसरातील शुक्लाजी रोडवरील अब्दुल रहमान इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. गुरुवारी दुपारी झालेल्या या दुर्घटनेत एका ७० वर्षांच्या वृद्धेसह १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली.  गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करुन दुर्घटनाग्रस्तांची तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था करण्याचा निर्णय आठवड्याभरात घेण्याची ग्वाही शेख यांनी  दिली. मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनास सूचना केल्या.

या ठिकाणी दोन इमारतीत मिळून १०९ कुटुंब आहेत. कॉमन टॉयलेट असणारा भाग कोसळला. वेळीच धोका ओळखून रहिवासी इमारतीबाहेर पडल्यानं मोठी दुर्घटना टळली. मुंबईत गेल्या काही दिवसात इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

जुलै महिन्यात फोर्ट येथे इतर मालाडमध्ये इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील टपाल मुख्यालयाजवळील पाच मजली ‘भानुशाली’ इमारतीचा काही भाग लगतच्या लकी हाऊस, गणेश चाळीवर कोसळला. यात सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा -

कोरोनामुक्त रुग्णांसाठी 'पोस्ट कोविड ओपीडी' होणार सुरू

नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक सक्रिय रुग्ण

मिरा-भाईंदरमधील वाढते मृत्यू चिंतेचा विषय



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा