Advertisement

नागपाड्यात ३ मजली इमारतीचा भाग कोसळला, मदत कार्य सुरू

गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात चार जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

नागपाड्यात ३ मजली इमारतीचा भाग कोसळला, मदत कार्य सुरू
SHARES

दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरात आणखी एका इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात चार जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यापैकी एका ११ वर्षांच्या मुलीला बाहेर काढण्यात यश आलं आहे.

दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरात असलेल्या शुक्लाजी मार्गावरील तीन मजली इमारतीचा भाग अचानक कोसळला. माहिती मिळताच अग्निशमन जवानांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत मदत कार्य सुरू केलं आहे. अग्निशमक दलाची पाच वाहनं, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे.

एक ७२ वर्षांची महिला आणि २ लहान मुलं ढिगाऱ्याखाली दबली असण्याची शक्यता आहे. बचावकार्य सुरू आहे. दोन इमारती मिळून १०९ कुटुंब आहेत. इतर सर्वांना बाहेर काढण्यात आलं आहे. कॉमन टॉयलेट असणारा भाग कोसळला. वेळीच धोका ओळखून रहिवासी इमारतीबाहेर पडल्यानं मोठी दुर्घटना टळली.

मुंबईत गेल्या काही दिवसात इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जुलै महिन्यात फोर्ट येथे इमारत कोसळली होती. त्याचबरोबर मालाडमध्येही इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील टपाल मुख्यालयाजवळील पाच मजली ‘भानुशाली’ इमारतीचा काही भाग लगतच्या लकी हाऊस, गणेश चाळीवर कोसळला. यात सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता.



हेही वाचा

महाड दुर्घटना : एकनाथ शिंदेंनी घेतले वाचलेल्या २ मुलांचे पालकत्व

फोर्ट परिसरातील इमारतीला आग, १ जण गंभीर जखमी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा