Advertisement

कुर्ल्यात भीषण आग; पार्किंग केलेल्या २० दुचाकी जळून खाक


कुर्ल्यात भीषण आग; पार्किंग केलेल्या २० दुचाकी जळून खाक
(Image: ANI Twitter)
SHARES

मुंबईच्या कुर्ला येथील नेहरू नगर परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये बुधवारी सकाळी भीषण आग लागली. ही आग इतकी तीव्र होती की तिथे उभ्या असलेल्या २० मोटारसायकली जळून राख झाल्या. अग्निशमन विभागाला माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तेथे पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली.

या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, आगीचे कारणही अद्याप कळू शकलेले नाही. नेहरू नगर येथील एका निवासी इमारतीमध्ये ही आग लागली होती. बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या जवळपास २० दुचाकींनी पेट घेतला व क्षणात ही आग वाढत गेली.

या आगीत २० मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत. ही आग इतकी भीषण होती की आगीचे लोट इमारतीच्या आठव्या मजल्यापर्यंत पोहोचले. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत सर्वच दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधित तपास करत असून याबाबत अधिक शोध घेत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा