Advertisement

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी RT-PCR अहवाल बंधनकारक

परदेशातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दाखवणं बंधनकारक आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी RT-PCR अहवाल बंधनकारक
SHARES

परदेशातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दाखवणं बंधनकारक आहे. लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या असलेल्यांना देखील चाचणीचा अहवाल दाखवणं बंधनकारक आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या नव्या नियमावलीनुसार राज्यानं हा बदल केलेला आहे. युरोपीय, आखाती भागातील देश आणि दक्षिण आफ्रिकेसह परदेशातून प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रवाशांना राज्यात प्रवेश करण्यासाठी कोरोनाची बाधा झाली नसल्याचा आरटीपीसीआर अहवाल दाखवणं बंधनकारक असल्याचे राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या नमूद करण्यात आलं आहे.

प्रवाशांनी लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या असल्या तरी चाचणी अहवाल दाखविणे बंधनकारक आहे. तसंच याआधीचे चाचण्यासंबंधीचे सर्व नियम या नव्या आदेशानुसार रद्द होत आहेत, असंही यात लिहिलं आहे.

दरम्यान, लवकरच प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल COWIN शी लिंक करता येणार आहे. यामुळे प्रवाशांना सोईस्कर होणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे प्रमुख आरएस शर्मा यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, “आम्ही आयसीएमआर (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च)च्या महासंचालकांसोबत काम करत आहोत. आम्ही आधीच प्रणाली विकसित केली आहे. ज्याच्या मदतीनं तुम्ही CoWIN प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. त्याचप्रमाणे, आता तुम्ही डिजिटल स्वाक्षरी केलेले RT-PCR प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता."

CoWIN अप सध्या लसीचे डोस बुक करण्याची सुविधा प्रदान करते आणि लसीकरण प्रमाणपत्र प्रदान करते. आता यापुढे तुम्ही RTPCR चाचणीचा अहवाल COWIN ला लिंक करू शकता.

दरम्यान, राज्यात ४ हजार ६६६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, १३१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. तर दुसरीकडे ३ हजार ५१० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) ९७% एवढा आहे. एकूण ५२ हजार ८४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.



हेही वाचा

विमान हवेत असतानाच पायलटला आला हार्ट अटॅक, पुढे...

मुंबईत ३० हजार खाटांपैकी फक्त ५०० खाटांवर रुग्ण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा