Advertisement

विमान हवेत असतानाच पायलटला आला हार्ट अटॅक, पुढे...

विमान हवेत असतानाच पायलटला हार्ट अटॅक आला.

विमान हवेत असतानाच पायलटला आला हार्ट अटॅक, पुढे...
SHARES

ओमानची राजधानी मस्कटहून ढाका इथं जाणाऱ्या बांग्लादेशी विमानातील पायलटला विमान हवेत असतानाच हृदयविकाराचा झटका (Pilot Suffers Heart Attack Mid-Air) आला. यामुळे संबंधित विमानाचं आपत्कालीन लँडिंग करावं लागलं आहे.

संबंधित विमान रायपूरजवळ होतं. यावेळी आपत्कालीन लँडिंगसाठी कोलकाता एटीसीशी संपर्क साधला असता आज नागपूर विमानतळावर या विमानाचं आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing in Nagpur) करण्यात आलं आहे.

पायलटनं कोलकाता एटीसीशी संपर्क साधला असता, त्यांना जवळच्या विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याची परवानगी देण्यात आली होती. नागपूर हे सर्वात जवळचं विमानतळ असल्यानं संबंधित विमानाचं नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं आहे. फ्लाइट ट्रॅकिंग अॅप FlightRadar24 वरील आकडेवारीनुसार, संबंधित विमान बोईंग ७३७-८ असल्याची माहिती समोर आली आहे.

भारतानं अलीकडेच बांग्लादेशी एअरलाइन्सला भारतासोबत विमानसेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. भारतातील कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे बराच काळ संबंधित विमान उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले होते. यानंतर दोन्ही देशांमधील हवाई प्रवासाला सरकारांनी परवानगी दिली होती.

सध्या ढाका ते कोलकाता दरम्यान आठवड्यातून तीन उड्डाणं सुरू करण्यात आली आहेत. तर ढाका-दिल्ली या हवाई मार्गावर दोन उड्डाणं चालवली जात असल्याची माहिती बुधवारी बांग्लादेशी विमान प्रशासनाकडून देण्यात आली होती.



हेही वाचा

विमान प्रवास महागला, 'असे' असतील नवे दर

बेस्टच्या ताफा वाढणार; २००० ई-बस होणार दाखल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा