Advertisement

विमान प्रवास महागला, 'असे' असतील नवे दर

विमानानं प्रवास करणाऱ्या लोकांना आता जास्त भाडे भरावे लागणार आहे.

विमान प्रवास महागला, 'असे' असतील नवे दर
SHARES

विमानानं प्रवास करणाऱ्या लोकांना आता जास्त पैसे भरावे लागणार आहेत. नागरी उड्डान मंत्रालयानं आता किमान आणि कमाल प्रवास दराची मर्यादा वाढवली आहे. यामुळे विमान कंपन्या तिकिटाचे दर वाढवू शकतात. कमीत कमी प्रवासात १०% आणि जास्तीत जास्त प्रवासात १३% वाढणार आहे.

गेल्या वर्षी देशव्यापी लॉकडाऊननंतर, मे महिन्यात सरकारनं विमान भाड्यांची मर्यादा निश्चित केली होती. कारण त्यावेळी कमी संख्येमध्ये विमान चालू होते. यामुळे कंपन्या तिकिटांसाठी जास्त पैसे आकारत होत्या. आता लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे आणि विमान प्रवाशांची संख्याही वाढत आहे. यामुळे सरकारनं ही मर्यादा वाढवली.

सरकारनं किमान भाडे ९.८३%नं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त भाडे १२.८२%नं वाढवलं आहे. विमान मंत्रालयानं गुरुवारी रात्री उशिरा आदेश जारी करून ही माहिती दिली आहे. लोअर कॅप अर्थात सरकारनं लावलेली किमान भाडे मर्यादा ही कंपन्यांना मदत करण्यासाठी होती. जास्तीत जास्त भाडे मर्यादेचा उद्देश प्रवाशांना मदत करणं हा होता.

मंत्रालयाच्या आदेशानुसार, ४० मिनिटांच्या प्रवासासाठी आता किमान भाडे २ हजार ९०० रुपये असेल. पूर्वी ते २ हजार ६०० रुपये होते. त्याच कालावधीसाठी जास्तीत जास्त भाडे आता ८ हजार ८०० रुपये असेल. पूर्वी ते ७ हजार ७०० रुपये होते.


हेही वाचा : लोकलच्या अपंग डब्यातील घुसखोरांवर कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ग्रुपचा वापर


त्याचप्रमाणे ४०-६० मिनिटांच्या उड्डाणासाठी किमान भाडे ३ हजार ७०० रुपये असेल. पूर्वी ते ३ हजार ३०० रुपये होते. जास्तीत जास्त भाडे ११ हजार रुपये असेल. ते पूर्वी ९ हजार ५०० रुपये होते.

दीड तासाच्या फ्लाइटचे किमान भाडे आता ४ हजार ५०० रुपये असेल. त्यात १२.५%वाढ झाली आहे. त्याचे कमाल भाडे १३ हजार २०० रुपये असेल. त्यात १२.८२%नं वाढ केली. त्याचप्रमाणे, दीड तासांपेक्षा जास्त म्हणजे ९०-१२० मिनिटांच्या फ्लाइटसाठी, किमान भाडे ४ हजार ७०० रुपयांऐवजी ५ हजार ३०० रुपये आणि १२०-१५० मिनिटांच्या फ्लाइटचे किमान भाडे ६ हजार १०० ऐवजी ६ हजार ७०० रुपये असेल. १५०-१८० मिनिटांच्या प्रवासासाठी किमान भाडे ७ हजार ४०० ऐवजी ८ हजार ३०० रुपये आणि १८० ते २१० मिनिटांच्या फ्लाइटसाठी ८ हजार ७०० ऐवजी ९ हजार ८०० रुपये असेल.

१२०-१५० मिनिटांच्या फ्लाइटचे किमान भाडे ६ हजार ७०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. या सर्व अंतराच्या उड्डाणांसाठी जास्तीत जास्त भाडे कमाल मर्यादा १२.३ वरून १२.३९% करण्यात आली आहे.

तसंच, या भाड्यात प्रवासी सुरक्षा शुल्क, विमानतळ वापरकर्ता विकास शुल्क आणि जीएसटी समाविष्ट नाही. म्हणजेच या मूलभूत भाड्यानंतर तुम्हाला प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागतील.हेही वाचा

कोविड लसीकरण पडताळणीतून सुटका, लोकल प्रवाशांना ई-पास मिळणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा