Advertisement

लोकलच्या अपंग डब्यातील घुसखोरांवर कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ग्रुपचा वापर


लोकलच्या अपंग डब्यातील घुसखोरांवर कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ग्रुपचा वापर
SHARES

अपंग प्रवासी आणि रेल्वे सुरक्षा दल कर्मचाऱ्यांचा एक व्हॉट्सअ‍ॅप गट तयार करण्यात आला आहे. लोकलमधील अपंगांच्या डब्यातून प्रवास करण्यास अन्य प्रवाशांना मनाई आहे. मात्र काही प्रवासी या डब्यात घुसखोरी करीत असल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलानं व्हॉट्सअ‍ॅपचा आधार घेतला आहे.

या गटाच्या माध्यमातून जानेवारी ते जुलै २०२१ या काळात अपंगांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या २६२ सामान्य प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्यात आली. लोकलमध्ये अपंगांसाठीच्या डब्यात अन्य प्रवासी प्रवास करत असल्याने त्यांच्यासोबत वादाचे प्रसंग घडतात. यातून मार्ग काढण्यासाठी अपंग प्रवासी आणि मध्य रेल्वे सुरक्षा दल कर्मचाऱ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप गट तयार करण्यात आला आहे. 

अपंगांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्यांचे छायाचित्र, स्थानकाचे नाव इत्यादी माहिती या गटावर पाठवल्यावर रेल्वे सुरक्षा कर्मचारी संबंधित स्थानकातील सुरक्षा दल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधतात आणि कारवाईला वेग येतो. संबंधित प्रवाशावर दंडात्मक कारवाईही के ली जाते. या व्हॉट्सअ‍ॅप गटात २०४ अपंग प्रवासी सदस्य आहेत.

हा गट २०२० मध्ये तयार करण्यात आला. परंतु कोरोनामुळे लोकल बंद, तसेच अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची परवानगी इत्यादींमुळे त्याद्वारे कारवाई थंडावली होती. परंतु हळूहळू वाढत गेलेली प्रवासी संख्या आणि येणाऱ्या समस्यांमुळे पुन्हा जानेवारी २०२१ पासून कारवाईला वेग आला.

मागील ७ महिन्यांत २६२ घुसखोर प्रवाशांविरोधात कारवाई करण्यात येत असून त्यांच्याकडून सुमारे ४८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा