महापालिकेचं 'अस्वच्छ भारत' अभियान

 Kandiwali
महापालिकेचं 'अस्वच्छ भारत' अभियान
महापालिकेचं 'अस्वच्छ भारत' अभियान
See all

बाबरेकरनगर - कांदिवली पश्चिमेकडील बाबरेकरनगर येथील महानगरपालिकेच्या दवाखान्याभोवती अस्वच्छता पसरली आहे. या दवाखान्याच्या भिंतीलगत कचरा साचलाय. त्यामुळे डास आणि दुर्गंधी पसरते आहे. स्थानिक दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार येथे झोपडपट्टीतील रहिवासी येऊन कचरा टाकतात. वारंवार आर दक्षिण पालिका विभागाकडे तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. याबाबत दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना विचारलं असता, 'आम्ही कोणी कचरा टाकल्यास ओरडतो. दिवसभर बाहेर आमचं लक्ष नसतं. घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून तेथे कारवाई करण्यात येईल. तसंच कचरा न टाकण्याबाबत स्थानिकांना सूचना केल्या जातील,' असं आर दक्षिण पालिका विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव गायकवाड यांनी सांगितलं.

Loading Comments