कुर्ल्याच्या नेहरूनगरमध्ये का होतो काळोख?

 Mumbai
कुर्ल्याच्या नेहरूनगरमध्ये का होतो काळोख?

नेहरूनगर - येथे रात्र झाली की काळोखच काळोख असतो. याचं कारण आहे इथल्या रस्त्यावर खराब झालेले लाईटचे बल्ब. या रस्त्यावरील बल्ब खराब असल्याने इथल्या रहिवाशांना अंधारात फिरावं लागत आहे. विशेष म्हणजे याकडे बेस्टचे कर्मचारी लक्ष तर देत नाहीतच पण स्थानिक लाइनमन देखील फिरकत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. दरम्यान लाईट नसल्याने महिलांसह आम्हालाही बाहेर पडायला भीती वाटत असल्याचे स्थानिक रहिवासी नजीब खान यांनी सांगितले.

Loading Comments