Advertisement

'ती जागा रिस्की नव्हती, माफी मागायला तयार' - अमृता फडणवीस


'ती जागा रिस्की नव्हती, माफी मागायला तयार' - अमृता फडणवीस
SHARES

मुंबई-गोवा क्रूझच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळेस मिसेस सिएम अमृता फडणवीस कशा क्रूझच्या अगदी टोकाला जाऊन बसल्या आणि सेल्फी घेण्यात कशा दंग झाल्या हे साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलं. या व्हायरल व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच फैलावर घेतलं. पण मिसेस फडणवीस मात्र आपलं काही चुकलं हे मानायला तयार नाहीत.

ती जागा रिस्की वा डेंजर नव्हती, आपण तर केवळ शुद्ध हवा खायला गेलो होतो, असं म्हणत मिसेस सिएमनी आता स्वतःचा बचाव सुरू केला आहे. तर त्याचवेळी कारवाईची मागणी झाली तर कारवाईला आणि माफी मागायलाही तयार असल्याचं आता अमृता फडणवीस सांगताहेत.


अमृता फडणवीस यांच्यावर टीका

रिस्की सेल्फीमुळे कित्येकांचा नाहक बळी जात आहे. त्यामुळे अशा जीवघेण्या सेल्फीपासून नागरिकांना रोखण्यासाठी पोलिस आणि प्रशासन प्रयत्न करत आहेत. अशावेळी चक्क मुख्यमंत्र्याच्या पत्नीनेच पोलिसांच्या सूचना धुडकावत रिस्की सेल्फी घेतल्याची घटना घडली. या घटनेनंतर सर्वच स्तरातुन अमृता फडणवीस यांच्यावर टीका होत आहे. त्यांच्याविरोधात कारवाईचीही मागणी होत आहे.


आरोप फेटाळले

या रिस्की सेल्फीनं मिसेस सिएमना चांगलंच अडचणीत आणल्याचं वाटत असताना त्यांनी मात्र आपल्यावरील डेंजर ठिकाणी सेल्फी काढल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. आपण ज्या जागी बसलो ती जागा रिस्की नव्हती. त्याच्या खाली आणखी पायऱ्या होत्या. त्यामुळे आपण पडलो असतो तरी आपल्याला काहीही झालं नसतं, असं त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. आपण माफी मागायलाही तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर आता पुढे काय होतं याच्याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.



हेही वाचा - 

मिसेस सीएमनाही सेल्फीचा मोह आवरेना; 'त्या' डेंजर सेल्फीवरून अमृता फडणवीस ट्रोल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा