Advertisement

मिसेस सीएमनाही सेल्फीचा मोह आवरेना; 'त्या' डेंजर सेल्फीवरून अमृता फडणवीस ट्रोल

मिसेस सीएमचं हे सेल्फी प्रेम इतकं जोरदार होतं की पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना हे रिस्की असल्याची जाणीव करून दिली. मात्र, त्या सेल्फी काढल्याशिवाय तिथून हटल्याच नाहीत.

मिसेस सीएमनाही सेल्फीचा मोह आवरेना; 'त्या' डेंजर सेल्फीवरून अमृता फडणवीस ट्रोल
SHARES

सेल्फीच्या नादात आतापर्यंत कित्येक जणांनी जीव गमावला आहे. तरी सेल्फीचा त्यातही डेंजर-रिस्की सेल्फीचा मोह काही कित्येक जणांना आवरत नसल्याचं चित्र आहे. अशा सेल्फीच्या मोहात खुद्द मिसेस सीएम अमृता फडवणीसही असल्याचं समोर आलं आहे. शनिवारी मुंबई-गोवा क्रुझच्या उद्धघाटनाच्या वेळी मिसेस सीएम उठल्या नि डेकवरची सुरक्षा रेलिंग ओलांडून क्रुझच्या अगदी टोकाला, जिथं कुणालाही जाण्यास मनाई आहे, अशा ठिकाणी जाऊन बसल्या नि सेल्फी काढू लागल्या.

 मिसेस सीएमचं हे सेल्फी प्रेम इतकं जोरदार होतं की पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना हे रिस्की असल्याची जाणीव करून दिली. मात्र, त्या सेल्फी काढल्याशिवाय तिथून हटल्याच नाहीत. त्यानंतर मिसेस सीएमचा हा व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून यावरून आता त्यांना नेटकरी ट्रोल करताना दिसत आहेत.



पोलिस हतबल

डेंजर आणि रिस्की ठिकाणी सेल्फी काढण्याचा जणू काही ट्रेण्डच सध्या सुरू झाला आहे. पण हा ट्रेण्ड जीवघेणा ठरत असून अशा सेल्फीमुळे आतापर्यंत कित्येकांनी जीव गमावला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सेल्फी काढण्यापासून नागरिकांना रोखण्याचं मोठं आव्हान पोलिस आणि प्रशासनासमोर उभं ठाकलं आहे. पोलिसांकडून वारंवार असं अावाहन सोशल मिडीयाच्या माध्यमातून केलं जात आहे. असं असताना पोलिसांच्या समक्ष खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच रिस्की सेल्फी घेताना दिसल्या. पोलिस यंत्रणाही यावेळी हतबल दिसली. 


सेल्फीची हौस भागवलीच

क्रुझच्या शेवटच्या टोकाला जाऊन मिसेस सीएम बसल्यानं पोलिस-सुरक्षा रक्षकांची काळजी वाढली. पण मिसेस सीएमन मात्र आपली सेल्फीची हौस पूर्ण झाल्यानंतरच या धोकादायक ठिकाणाहून उठल्या. जशा मिसेस सीएम उठल्या आणि त्या पुढे आल्या तसा पोलिस-सुरक्षा रक्षक आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडूनच अशी कृती होत असल्याचं म्हणत सोशल मिडियावरून याप्रकरणी चांगलीच टिका  होत आहे. 



हेही वाचा - 

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक

अंधेरीतील ११ हॉटेलवर पालिकेचा हातोडा




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा