
मुंबईत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना आझाद मैदान येथील एएनसी युनिटच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अटक केली. जॉन्सन उडे ईमे (४४), आयग्व्यू ईदाम फेलिक्स (४६), इजीके गुडवील ओलेचीक्यू (३५), ईर्नेस्ट ओकोरोजी इजीमे (२८), ची बासिल ओनाग्वेसा (२८) अशी अटक आरोपींची नावं असून हे सर्व जण नायजेरियन नागरिक आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून २ लाख १० हजार रुपयांची ४२ ग्रॅम कोकेन, २० हजार रुपयांची १० ग्रॅम एमडी, २८ हजार रुपयांची ४ ग्रॅम एमडीएमए अशाप्रकारे एकूण २ लाख ५८ हजार रुपये किंमतीचं अमली पदार्थ जप्त केलं आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील भायखळा रेल्वे स्थानकाच्या परिसरात अमली पदार्थांच्या तस्करीच्या घटना नेहमी घडत असतात. या ठिकाणी अनेकदा पोलिसांनी कारवाई केल्या होत्या. मात्र, शुक्रवारी या परिसरात पोलिस कारवाई करत असताना काहींनी त्यांच्यावर हल्ला केला.
