अंधेरीतील ११ हॉटेलवर पालिकेचा हातोडा


  • अंधेरीतील ११ हॉटेलवर पालिकेचा हातोडा
  • अंधेरीतील ११ हॉटेलवर पालिकेचा हातोडा
SHARE

अंधेरी (प.) येथील ११ उपहारगृहांमधील अनधिकृत बांधकामांवर पालिकेने तोडक कारवाई केली आहे. के पश्चिम विभागात असलेल्या इंडिपेंडंट ब्रेवरीज, स्पेस बार, लिटील डोअर, कॅलिडो, ब्र्यूबॉट, ऑटम, ग्लोकल जंक्शन, बी देसी आणि बियॉण्ड बार या ११ उपहारगृहांवर पालिकेने हातोडा चालवला आहे.


या उपहारगृहांवर परिमंडळ-४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली होती. या ११ उपहारगृहांमधील मोकळ्या जागेत देखील अनधिकृतरित्या बांधकाम दरम्यात आलं होतं, अशी माहिती के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.


महापालिकेच्या के पश्चिम विभागात जुहू, जोगेश्वरी (प.), अंधेरी (प.), विलेपार्ले (प.), जुहू समुद्रकिनारा, ओशिवरा, वर्सोवा आणि वर्सोवा समुद्र किनारा इत्यादी परिसरांचा समावेश आहे. याच विभागातील उपहारगृहांमधील मोकळ्या जागेत केलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेने तोडक कारवाई केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या