कॅफेटेरिया पार्किंग, न्यायाधीशांसाठी निवासस्थानासह सोयीसुविधा असलेली मुंबई उच्च न्यायालयाची वांद्रे (पूर्व) (bandra) येथे नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.
या संकुलाच्या बांधकामासाठी 3,750 कोटींचा खर्च अपेक्षित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे. वांद्रे (पूर्व) येथे शासकीय वसाहतीतील सुमारे 30.16 एकरवर उच्च न्यायालयाचे नवीन संकुल (complex) उभारले जाणार आहे.
याठिकाणी उच्च न्यायालयाचे (bombay high court) हायकोर्ट रुम, न्यायाधीशांची दालने आणि अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठीची दालने, सभागृह, ग्रंथालय याशिवाय न्यायाधीशांची निवासस्थाने, प्रशस्त वाहनतळ यांसह अनेकविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हा महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला असून तो वेळेत पूर्ण केला जाणार आहे.
मुंबईतील (mumbai) फ्लोरा फाऊंटन येथे 16 ऑगस्ट 1862 रोजी स्थापन झालेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत आहे. ही भव्य इमारत केवळ 6 न्यायालये आणि दहा न्यायाधीशांच्या वापरासाठी तयार करण्यात आली होती. मुंबई ही महाराष्ट्राची (maharashtra) राजधानी असून औद्योगिक आणि आर्थिक विकासात आघाडीवर आहे.
नवीन प्रस्तावित संकुलात न्यायालयीन खोल्या, न्यायाधीश आणि नोंदणी कर्मचाऱ्यांसाठी चेंबर्स, वकील चेंबर्स, सभागृह, ग्रंथालय याबरोबरच बँकिंग सुविधा, वैद्यकीय सुविधा, कॅफेटेरिया, कार पार्किंग, संग्रहालय अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध असतील. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा या इमारतीत असणार आहे.