Advertisement

मुंबईत कोरोनाग्रस्तांसाठी महापालिका बांधणार नवं रुग्णालय

सध्याच्या रुग्णांची वाढती संख्या पाहाता आणि कोरोनाचा वाढता धोका पाहाता एक विशेष रुग्णालय आवश्यक असल्याची गरज प्रशासनानं व्यक्त केली आहे.

मुंबईत कोरोनाग्रस्तांसाठी महापालिका बांधणार नवं रुग्णालय
SHARES

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्यानं वाढ होत आहे. या रुग्णांवर पालिकेची सर्व रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. तसंच, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर तातडीनं उपचार करण्यासाठी महापालिकेनं सातरस्ता येथील कस्तुरबा रुग्णालय परिसरात लवकरच खास कोरोनाग्रस्तांवरील उपाचारांसाठी नवे रुग्णालय बांधणार आहे. तळमजला अधिक २ मजल्यांच्या या इमारतीचं बांधकाम चीनच्या धर्तीवर प्री- इंजिनीअरर्ड पद्धतीनं केलं जाणार आहे. या कामासाठी टेंडर निघाले असून, पुढील महिन्यात मेपासून इमारतीचं बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे.

कस्तुरबा रुग्णालयासह उपनगरातील १९ रुग्णालयं, खासगी रुग्णालयं, हॉटेल, लॉजिंग-बोर्डिंग याठिकाणी उपचार आणि विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र सध्याच्या रुग्णांची वाढती संख्या पाहाता आणि कोरोनाचा वाढता धोका पाहाता एक विशेष रुग्णालय आवश्यक असल्याची गरज प्रशासनानं व्यक्त केली आहे.

कोरोनासारख्या आजारावर प्रभावी उपचार करता यावेत यासाठी हे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. विषाणूजन्य आजारावर उपचार करणारे पालिकेचे कस्तुरबा हे विशेष रुग्णालय आहे. या ठिकाणी २५० खाटा, १० व्हेंटिलेटर सज्ज ठेवण्यात आले आहेत.

या रुग्णालयात करोना चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळाही सुरू करण्यात आली आहे. उपचाराची क्षमता वाढविण्यासाठी नवीन करोना रुग्णालयातील वॉर्डमध्ये ४७ खाटा असणार आहेत. तसंच, ६ खाटांचं आयसीयू आणि इतर रूममध्ये प्रत्येकी ७ खाटा असणार आहेत. निर्जंतुकीकरणासाठी विशेष कक्षही असणार असल्याची माहिती मिळते.

हे रुग्णालय प्री-इंजिनीअरर्ड पद्धतीने बनवले जाणार असून या पद्धतीने इमारत उभारण्यासाठी लागणारे साहित्य हे कारखान्यात बनवले जाते आणि त्याची जोडणी प्रत्यक्ष जिथे इमारत बांधली जाते तिथे केले जाते. या पद्धतीने काम वेगाने तसेच अचुक होत असल्याचा दावा केला जातो.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा