• जीवीकेविरोधात कँडल मार्च
SHARE

सहार - मस्जिद कमिटी आणि एअरपोर्ट कृती समितीच्या वतीने शनिवारी सहार सुतार पाखाडी सहार कार्गो कॉम्प्लेक्स गेट ते विमानतळ टर्मिनलपर्यंत मूक कँडल मार्च काढण्यात आला. जीवीके, एमआयएएल आणि एमएमआरडीए तर्फे 100 वर्षापूर्वीचा सहार इंटरनॅशनल एअरपोर्ट रोड बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याने तसंच सुतार पाखाडी रोड विमानसंचार क्षेत्र घोषित केल्याविरोधात हा मूक कँडल मार्च काढण्यात आला.

येथील नागरिकांनी या प्रकल्पाचा विरोध केला आहे. विमानतळानजीकच्या झोपड्यांचे पुनर्वसन देखील केले जात नाही. लोकांच्या विरोधाला न जुमानता जीवीके हा प्रकल्प पार पाडत आहे. त्यामुळे त्याविरोधात आपण हा कँडल मार्च काढल्याचं माजी नगरसेवक आणि विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष निकोलस अलमेडा यांनी सांगितलं. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या