Advertisement

रात्रशाळा सुरूच राहणार - सुनील सुसरे


रात्रशाळा सुरूच राहणार - सुनील सुसरे
SHARES

रात्रशाळा लवकरच बंद होतील, अशी अफवा मागील काही दिवसांपासून पसरलेली होती. मात्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार दुबार काम करणाऱ्या शिक्षकांना केवळ एकाच शाळेत काम करता येणार असले तरी रात्रशाळा बंद होणार नाहीत. 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक रात्रशाळेत असेल. त्यामुळे रात्रशाळेतील शिक्षकांना घाबरण्याचे कारण नाही, अशी भूमिका सोमवारी रात्रशाळा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुनील सुसरे यांनी मांडली. ते आझाद मैदान येथील पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यात एकूण 1010 शिक्षक दिवस आणि रात्र अशा दोन्ही शाळांमध्ये कार्यरत होते. या शिक्षकांच्या वेतनापोटी शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत होता. त्यामुळे शासनाने रात्रशाळेत काम करत असलेल्या शिक्षकांना दुबार नोकरी करता येणार नाही, असा शासकीय अध्यादेश (जीआर) काढला. 26 ऑगस्ट 2016 रोजी काढण्यात आलेल्या जीआरमुळे रात्रशाळा बंद होतील, अशी अफवा पसरली होती. या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी शासनाने 17 मे 2017 रोजी नवीन जीआर काढून 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक रात्रशाळेत असेल, असे स्पष्ट केले आहे. यावरून रात्रशाळा बंद होणार नसल्याचे सुसरे यांनी स्पष्ट केले.

17 मे 2017 च्या नव्या जीआरनुसार रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना नवीन शिक्षक मिळणार आहेत. यामुळे अनेक बेरोजगार शिक्षकांना रात्र शाळेत नोकऱ्या मिळणार आहेत. केवळ रात्र शाळेतील शिक्षकांना कमी न करता, दुबार उत्पन्न घेणाऱ्या शिक्षकांना कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांचे भवितव्य उज्ज्वल असणार आहे.
- सुनील सुसरे, अध्यक्ष, रात्र शाळा शिक्षक संघटना

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा