पालिकेचे 8 नवे रात्र निवारे लवकरच

 Mazagaon
पालिकेचे 8 नवे रात्र निवारे लवकरच
पालिकेचे 8 नवे रात्र निवारे लवकरच
See all

भायखळा - मुंबई महानगर पालिकेच्यावतीनं आणखी 8 नवे रात्रनिवारे लवकरच उभारण्यात येणार आहेत. ज्यापैकी एक रात्र निवारा येत्या वर्षात जे.जे.पुलाजवळ सुरू करण्यात येणार आहे. दिवसभर काबाडकष्ट करून रात्री ज्यांच्याकडे घरं नाही अशांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं 2012 मध्ये 8 रात्रनिवारे बांधण्यात आले होते. ज्याच्या देखरेखीचं कामं खासगी संस्थांकडे देण्यात आलं होतं. या आठ रात्र निवाऱ्यांपैकी एक रात्र निवारा बाबुरावजगताप मार्ग येथील पठाण चाळ येथे उभारण्यात आला होता. मात्र गेल्या सहा महिन्यांपेक्षाही जास्तकाळ हा रात्र निवारा धुळखात पडलाय. रात्र निवाऱ्यांची अशी परिस्थिती असतानाही आणखी आठ रात्र निवारे पालिकेकडून का उभारण्यात येणार आहेत असा प्रश्न निर्माण झालाय.

Loading Comments