Advertisement

दुसऱ्या सहामाहीतील मालमत्ता कर भरण्यास एनएमएमसीकडून ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी १५ डिसेंबर २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ या दोन महिन्यांच्या कालावधीत मालमत्ताकर थकबाकीदारांच्या दंडाच्या रक्कमेवर ७५ टक्के सवलत देणारी अभय योजना जाहीर केली.

दुसऱ्या सहामाहीतील मालमत्ता कर भरण्यास एनएमएमसीकडून ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ
SHARES

वर्ष २०२०-२१ मधील दुसऱ्या सहामाहीची वितरित करण्यात आलेली मालमत्ताकर देयके भरणा करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२० होती. मात्र, नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी या कालावधीतील देयक रक्कम भरणा करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च पर्यंत वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी आपली या आर्थिक वर्षातील दुस-या सहामाहीची देयक रक्कम लवकरात लवकर भरणा करून शहर विकासास आपला हातभार लावावा असं आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे.    

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच घटकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. यामुळे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी १५ डिसेंबर २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ या दोन महिन्यांच्या कालावधीत मालमत्ताकर थकबाकीदारांच्या दंडाच्या रक्कमेवर ७५ टक्के सवलत देणारी अभय योजना जाहीर केली. यामुळे थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळाला.  

त्यानंतर योजनेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली जात होती. या मागण्यांची दखल घेऊन १ मार्च २०२१ पर्यंत अभय योजनेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अभय योजनेचा कालावधी संपण्यास आता केवळ ४ दिवस उरले असून मालमत्ताकर थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महानगरपालिकेच्या http:/www.nmmc.gov.in या वेबसाईटला भेट देऊन आपली रक्कम भरावी आणि अभय योजनेच्या सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहन पालिकेने केलं आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा