मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट: कोळी भगिनींनो बिनधास्त वापरा थर्माकोल बॉक्स!

थर्माकोलच्या बॉक्समध्ये मासे साठवल्यावर कारवाई होईल, या भीतीने मुंबईतील मासे विक्रेते आणि कोळी भगिनी चिंतेत होत्या. 'मुंबई लाइव्ह'ने मासे विक्रेत्यांना भेडसावणारी समस्या जाणून घेत या संदर्भतील वृत्त दिलं होतं. या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना मासे विक्रेते वापरत असलेल्या थर्माकोलवर बंदी नसल्याचा खुलासा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला.

  • मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट: कोळी भगिनींनो बिनधास्त वापरा थर्माकोल बॉक्स!
SHARE

राज्यात प्लास्टिकसह थर्माकोलवर बंदी असल्याने थर्माकोलच्या बॉक्समध्ये मासे साठवल्यावर कारवाई होईल, या भीतीने मुंबईतील मासे विक्रेते आणि कोळी भगिनी चिंतेत होत्या. 'मुंबई लाइव्ह'ने मासे विक्रेत्यांना भेडसावणारी समस्या जाणून घेत या संदर्भतील वृत्त दिलं होतं. या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना मासे विक्रेते वापरत असलेल्या थर्माकोलवर बंदी नसल्याचा खुलासा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला.


कोळी भगिनींना नुकसान

प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोल बंदीमुळे कोळी भगिनींकडून वापर होत असलेल्या थर्माकोल बॉक्सवरही कारवाई होईल. थर्माकोलच्या बॉक्सवर कारवाई होणार असल्याने मासे साठवून ठेवण्यासाठी प्लास्टिक बॉक्सची खरेदी करावी लागेल. हे बॉक्स खरेदी न केल्यास त्यांना न विकलेले मासे फेकून द्यावे लागतील किंवा स्वस्तात विकावे लागतील, अशा आशयाचं वृत्त 'मुंबई लाइव्ह'ने देऊन कोळी भगिनींच्या समस्येला हात घातला होता. त्यामुळे सर्व कोळी भगिनी पेटून उठल्या होत्या. त्याचीच दखल घेऊन पर्यावरणमंत्री कदम यांनी त्यावर स्पष्टीकरण देत कोळी भगिनींना दिलासा दिला.प्लास्टिक बाॅक्स द्या

तत्पूर्वी महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी थर्माकोल बॉक्सवर वापल्यास दंडात्मक कारवाई होणार असेल, तर या सर्व कोळी भगिनींना महापालिका अथवा नगरसेवक निधीतून प्लास्टिक चे बॉक्स उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती.


मनातली भीती दूर

कदम यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर कोळी भगिनींच्या मनातील एक भीती दूर झाली आहे. याचं स्वागत करत असल्याचं कलिना मार्केटमधील कोळी भगिनी नयना पाटील यांनी सांगितलं. प्लास्टिक पिशव्यांना पर्यायी पिशव्या मार्केटमध्ये उपलब्ध करून दिल्यास मच्छी घेण्यास येणाऱ्या नागरिकांनी गैरसोय होणार नाही, असं त्यांनी म्हटलं.

सोबतच भविष्याचा विचार करून या सर्व कोळी भगिनींना प्लास्टिक बॉक्स उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.हेही वाचा-

कोळी भगिनींना प्लास्टिक कंटेनर द्या - राष्ट्रवादीची मागणी

प्लास्टिक बंदी: कोळीणींना फेकून द्यावे लागणार मासेसंबंधित विषय
ताज्या बातम्या