Advertisement

कोळी भगिनींना प्लास्टिक कंटेनर द्या - राष्ट्रवादीची मागणी


कोळी भगिनींना प्लास्टिक कंटेनर द्या -  राष्ट्रवादीची मागणी
SHARES

प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचा मोठा फटका मुंबईचे भूमिपुत्र असलेल्या कोळी भगिनींना बसणार आहे. विक्रीनंतर शिल्लक राहिलेले मासे हे कोळी भगिनी थर्माकोलच्या पेटीमध्ये बर्फ टाकून साठवून ठेवतात. परंतू आता या थर्माकोलच्या पेटीवर कारवाई केली जाणार असल्याने त्यांनी आपली मासळी ठेवायची कुठे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव केला अाहे. त्यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना निवेदन देऊन प्लास्टिक तथा फायबरच्या पेट्या महापालिकेच्या निधीतून कोळी भगिनींना मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.


पर्यायी पिशव्या द्याव्यात

राखी जाधव यांनी प्लास्टिक पिशव्यांसह थर्माकोल बंदीच्या निर्णय आणि अंमलबजावणीचे समर्थन केले अाहे. मात्र, कोळी बांधवांसह सामान्य जनतेलाही याचा त्रास होणार नाही याची काळजी  घेण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली आहे. बाजार विभागांमध्ये प्लास्टिक बंदीची कारवाई करण्यापूर्वी महापालिकेने आपल्या बाजारांमध्ये प्लास्टिक पिशव्यांना पर्यायी पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात. जेणेकरून नागरिकांची मटणासह मासळी खरेदी करताना तसेच अन्य वस्तू खरेदी करताना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं अाहे. 




हेही वाचा -

प्लास्टिक बंदी : आता भरा ५ हजार रुपये दंड, राज्य सरकारचा दंड शिवसेनेला मान्य

आरेतील आदिवासींना हात लावायचा नाही- उच्च न्यायालय




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा