Advertisement

प्लास्टिक बंदी: कोळीणींना फेकून द्यावे लागणार मासे

थर्माकोलच्या बॉक्सवर कारवाई होणार असल्यानं मासे विक्रेत्यांना मासे साठवून ठेवण्यासाठी पर्यायी चांगल्या दर्जाच्या प्लास्टिक बॉक्सची खरेदी करावी लागणार आहे. मात्र, हे बॉक्स खरेदी न केल्यास त्यांना न विकलेले मासे एकतर फेकून द्यावं लागणार, नाहीतर स्वस्तात विकून टाकावं लागणार आहे.

प्लास्टिक बंदी: कोळीणींना फेकून द्यावे लागणार मासे
SHARES

प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी लागू होत असल्याने आतापर्यंत थर्माकोल बॉक्समध्ये बर्फ टाकून मासे साठवून ठेवणाऱ्या कोळी भगिनींवरील खर्चाचा आर्थिक भार वाढणार आहे. थर्माकोलच्या बॉक्सवर कारवाई होणार असल्यानं मासे विक्रेत्यांना मासे साठवून ठेवण्यासाठी पर्यायी चांगल्या दर्जाच्या प्लास्टिक बॉक्सची खरेदी करावी लागणार आहे. मात्र, हे बॉक्स खरेदी न केल्यास त्यांना न विकलेले मासे एकतर फेकून द्यावं लागणार, नाहीतर स्वस्तात विकून टाकावं लागणार आहे.


२३ जूनपासून कारवाई

प्लास्टिक पिशव्या नसल्याने ग्राहकांना मासे द्यायचे कसं या विचारानं कोळी भगिनी हवालदिल झाल्या आहेत. २३ जून पासून प्लास्टिक पिशवी आणि थर्माकोलच्या वस्तूंवर कारवाई केली जाणार आहे. प्लास्टिक पिशवी किंवा थर्माकोल आदी वस्तूंचा वापर करताना किंबहुना हाताळताना आढळल्यास संबंधित नागरिक, दुकानदार आणि विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.


'या' पिशव्यांची करा खरेदी

महापालिका मंडई अथवा रस्त्यांवर मासे विक्री करणाऱ्या कोळी भगिनी आणि चिकन, मटण विक्रेता प्लास्टिक पिशवीतून मासे अथवा मांस मटण देत असतो. परंतु, या पिशव्या बंद होत असल्यानं आता नागरिकांना स्वतंत्र नायलॉन किंवा रेक्झिनची पिशवीची खरेदी करावी लागणार आहे. ज्यामुळे त्यांना मासे अथवा मांस मटण या पिशवीतून बिनधास्तपणे नेता येईल.


बॉक्सवरही होणार कारवाई

मात्र, विक्रीसाठी आणलेले मासे विकले न गेल्यास ते थर्माकोल बॉक्समध्ये बर्फ टाकून साठवून ठेवले जातात. या बॉक्सवरही कारवाई होणार असल्यानं कोळी भगिनींची मासे ठेवायची गैरसोय होणार आहे. त्यामुळे यावर प्लास्टिक बॉक्स हाच पर्याय असल्यानं त्यांना तो खरेदी करावा लागणार आहे.


सध्या थर्माकोल बॉक्स हा केवळ १०० रुपयांमध्ये मिळतो तर प्लास्टिक बॉक्स हा अडीच ते पाच हजार रुपयांमध्ये मिळतो. मग आम्ही करायचं काय? तसंच नायलॉन किंवा रेक्झिन पिशव्या करवाईपूर्वी मार्केटमध्ये उपलब्ध करून द्याव्यात
- नयना पाटील, मच्छी विक्रेता


हेही वाचा - 

प्लास्टिक बंदी: दंड कमी करणं आता सत्ताधाऱ्यांच्या हाती!

प्लास्टिक बंदी : हातात पिशवी सापडल्यास २०० रुपये दंड

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा