Advertisement

वन टाइम यूज प्लास्टिक, थर्माकोलवर होणार कारवाई

फेरीवाला, दुकाने आणि बाजार भागांमध्ये कारवाई करण्यासाठी अनुक्रमे परवाना विभाग, दुकाने व आस्थापना आणि बाजार विभागाच्या २४९ निरिक्षकांची यादीत तयार करण्यात आली आहे.

वन टाइम यूज प्लास्टिक, थर्माकोलवर होणार कारवाई
SHARES

प्लास्टिक पिशव्या बंदीच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी येत्या २३ जूनपासून होणार आहे. ठराविक जाडीच्या पिशव्यांसह वन टाइम यूज प्लास्टिकवर बंदी असल्याने केवळ या वस्तू वापरल्यास महापालिकेच्या कारवाईला सोमोरं जावं लागू शकतं. त्यामुळे मुंबईकरांनी प्लास्टिक बंदीच्या निर्णयानुसार याेग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन महापालिकेने केलं आहे.


निरिक्षकांना कारवाईचं प्रशिक्षण

फेरीवाला, दुकाने आणि बाजार भागांमध्ये कारवाई करण्यासाठी अनुक्रमे परवाना विभाग, दुकाने व आस्थापना आणि बाजार विभागाच्या २४९ निरिक्षकांची यादीत तयार करण्यात आली आहे. यासर्वांचं पहिलं प्रशिक्षण १२ जूनला पार पडलं असून यामध्ये कुठे? कोणावर आणि कशा पद्धतीनं कारवाई करायची तसंच कायदेशीर प्रक्रिया कशाप्रकारे राबवायची याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. मंगळवारी दुसरं प्रशिक्षण शिबीर वरळीतील मंडईतील जागेत होणार असल्याचं उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी स्पष्ट केलं.


'या' वस्तूंवर दंड नाही

मुंबईत ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या पिशव्या वापरण्यास बंदी असल्याने त्या पिशव्यांवर कारवाई केली जाणार आहे. प्लास्टिकच्या पिशव्या हा कारवाईचा पहिला भाग असून पिशव्यांसोबतच एकदाच वापर करून फेकून देण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवरही कारवाई केली जाणार आहे. ज्या वस्तूंचा वापर आपण दिर्घकाळ करू शकतो, अशा प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या वस्तूंवर कारवाई केली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.



थर्माकोलवरही कारवाई

याबरोबरच थर्माकोलच्या वस्तूंवर कारवाई केली जाणार आहे. परंतु ते सरसकट नाही. डेकोरेशनसाठी वापरण्यात येणारं थर्माकोल तसंच पार्टींसाठी वापरण्यात येणारी ताट, ग्लास, चहा आणि सरबत साठी वापरण्यात येणारे प्लास्टिक कपवर कारवाई केली जाणार आहे. मात्र, औषधे तसंच इतर वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या कंपनींकडून पॅकींग करून येणाऱ्या थर्माकोल आणि त्यातील प्लास्टिकवर कारवाई करण्यात येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


कोणत्या वस्तूंवर कारवाई?

सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, चहाचे कप, सरबत ग्लास, थर्माकोल प्लेट,ग्लास , डेकोरेशनसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल साहित्य आदी


'या' वस्तूंवर कारवाई नाही

उत्पादित कंपन्यांच्या पॅकींगमधील थर्माकोल, पेन, पुस्तकावरील प्लास्टिकचे कवर, रेनकोट, प्लास्टिकचे डबे.



हेही वाचा-

प्लास्टिकबंदी इफेक्ट! महापालिकेकडे १२० टन प्लास्टिक जमा

मुंबई विद्यापीठातही आता 'प्लास्टिकबंदी’!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा