Advertisement

एसटी संपामुळे एेन दिवाळीत एसटी डेपोतील स्टॉलधारकांचं दिवाळं!


एसटी संपामुळे एेन दिवाळीत एसटी डेपोतील स्टॉलधारकांचं दिवाळं!
SHARES

चौथ्या दिवशीही एसटी संपावर तोडगा न निघाल्याने ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल तर झालेच, मात्र एसटी डेपोमधील स्टॉल धारक आणि कॅन्टिन धारकांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे. एसटी संपामुळे प्रवाशांनी डेपोकडे पाठ फिरवल्यामुळे आपोआपच या स्टॉलमधील खाद्यपदार्थांच्या विक्रीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे जगायचे तरी कसे? असा प्रश्न या स्टॉलधारकांना पडलाय.


काय झालाय परिणाम?

मुंबई सेन्ट्रल डेपोमध्ये स्टॉलचा रोजचा धंदा हा 10 ते 12 हजार आणि तर कॅन्टिनचा रोजचा धंदा 20 ते 22 हजार आहे. त्यातच दिवाळी किंवा सीझनमध्ये स्टॉलचा धंदा हा 20 ते 25 हजारावर जातो. तर कॅन्टिनचा धंदा 30 ते 40 हजाराच्या घरात जातो. मात्र, या संपामुळे रोज 10 ते 12 हजार रुपयांचा धंदा आता 400 ते 500 रुपयांवर आला आहे.

मी श्री गणेश जनरल स्टोअरचे टेंडर घेतले आहे. मला महिन्याला 31 हजार भाडं, 6 हजार लाईट बिल भरावं लागतं. आधी 10 ते 12 हजार रुपये धंदा व्हायचा. त्यामुळे दिवसाला भाडं देताना अडचण येत नव्हती. मात्र, आता धंदाच बसल्याने भाडं कुठून देणार?

शेखर शेट्टी, कंत्राटदार


रोज द्यावं लागतं इतकं भाडं! 

एसटीच्या टेंडरमध्ये या स्टॉल आणि कॅन्टिनचे टेंडर निघते. यावेळी लाखो रुपये डिपॉझिट भरून हे स्टॉल आणि कॅन्टिन भाड्याने चालवण्यासाठी घेतले जातात. स्टॉलचं दिवसाला 1 ते 2 हजार रुपये भाडं आणि कॅन्टिनचं महिन्याला दीड ते 2 लाख भाडं एसटीला द्यावं लागतं. मात्र आता धंदाच बसल्याने पैसे आणायचे तरी कुठून? असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे.

दोन कॅन्टिनचं महिन्याला दीड लाख आणि स्टॉलचं दिवसाला 2 हजार रुपये भाडं द्यावं लागतं. मात्र, गेल्या 4 दिवसांपासून पॅसेंजर नसल्यामुळे पूर्णपणे तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच कामाला मुलं ठेवल्याने त्यांना पगार द्यावा लागतो. आता ही जर परिस्थिती अशीच राहिली, तर आम्हाला हे सगळं सोडून घरी बसावं लागेल.

अनिल पांडे, स्टॉल/कॅन्टिनधारक



हेही वाचा

दादरचे फेरीवाले का हटत नाहीत?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा