Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव
SHARES

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम नं ३६ (ह) अन्वये तातडीची सभा घेऊन त्यात मुंबई महापौरांवर अविश्वास ठरावाचा प्रस्ताव सादर केला.या प्रस्तावाची चर्चा करण्यासाठी महापौरांनी त्वरीत प्रत्यक्ष बैठक लावावी अशी विनंती भाजपने पत्राद्वारे केली आहे.

“भोजन से कफन तक” आशा नावाखाली महापालिकेत भ्रष्टाचार सुरु आहे. याला वाचा फुटू नये म्हणून महापौरांनी मागच्या ६ महिन्यात एकही बैठक घेतली नाही. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारेही बैठक घेतली नाही, असंही प्रभाकर शिंदे म्हणाले.

सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन यांनी हातात हात घालून भ्रष्टाचार केला. आमची बांधिलकी मुंबईकरांसोबत आहे. वाटण्यात आलेल्या खिचडीचा दर ४० रुपये होते. NGO चा दर १५ रुपये होता. प्रेताच्या कव्हर बॅग पालिकेने ६७०० रुपयांना विकल्या. आम्ही पत्र पाठवली, आंदोलने देखील केली. मुंबईतील कोरोना रुग्ण लुटीच्या उंबरठ्यावर आहे. आम्ही नेहमी यावर संघर्ष करत राहिलो, पण महापौरांनी एकही बैठक घेतली नाही.  स्थायी समितीची सभा लावली असताना महापौरांनी ती रद्द केली, असा हल्लाबोल प्रभाकर शिंदे यांनी केला.Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा