SHARE

करी रोड - येथील पुलावर वाहनांना प्रवेश बंदी असल्याने स्थानिक रहिवाशांची मोठीच गैरसोय होते आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या दोन आणि चार चाकी वाहनांना भारतमाता टॉकीज ते महादेव पालव मार्गापर्यंत प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी करणारं निवेदन भोईवाडा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आलंय.

भारतमाता ते महादेव पालव मार्ग हा प्रवास खरं तर अवघ्या तीन मिनिटांचा. पण, करी रोड पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने स्थानिकांना चिंचपोकळी पुलावरून वळसा घालून जावं लागतंय. हा वळसा आणि वाहतूक कोंडीमुळे तीन मिनिटांचा प्रवास अर्ध्या तासाचा होतोय. त्यामुळे विघ्नहर्ता, सुखकर्ता, कामगार स्व सदन, रामदूत परिसर आणि त्रिवेणी सदन येथे राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. निदान स्थानिक रहिवाशांच्या वाहनांना तरी करी रोड पुलावर एन्ट्री मिळावी, अशी या रहिवाशांची मागणी आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या