Advertisement

कोरोनाची परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत मालमत्ता करात वाढ नाही - महापौर

मुंबई महापालिकेने मालमत्ता करात १४ टक्के ते २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत एक हजार कोटी रुपयांची वाढ होणार होती.

कोरोनाची परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत मालमत्ता करात वाढ नाही - महापौर
SHARES

मुंबईकरांना मोठा दिलासा देणारा बातमी आहे. मुंबईमध्ये सध्यातरी मालमत्ता करात कसलीही वाढ होणार नाही. कोरोनाची (Coronavirus) परिस्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत मुंबईमध्ये मालमत्ता करामध्ये (Property Tax) कोणतीही वाढ होणार नाही, असं महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी म्हटलं आहे. 

कोरोनामुळे लाखो, कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. व्यवसाय, रोजगार बंद पडले आहेत. मुंबईकर आर्थिक संकटात सापडले आहेत. हे सर्व सुस्थितीत येण्यास किती काळ लागेल याची माहिती नाही. तोपर्यंत मुंबईकरांवर मालमत्ता कर दरवाढीचा बोजा टाकणार नाही, असं महापौर म्हणाल्या.

मुंबई महापालिकेने मालमत्ता करात १४ टक्के ते २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत एक हजार कोटी रुपयांची वाढ होणार आहे. मालमत्ता कर वाढीला विरोधी पक्षाने कडाडून विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मालमत्ता कर वाढवणार नसल्याचं सांगितलं आहे. 

बीएमसीच्या कायद्यानुसार, मुंबईत दर पाच वर्षांनी मालमत्ता करात बदल होतो. २०१५ मध्ये त्यात सुधारणा झाली. यानंतर २०२० मध्येच त्यात सुधारणा करण्यात येणार होती. मात्र, कोरोना संकटामुळे राज्य सरकारने ही वाढ पुढे ढकलली. मार्च २०२० मध्ये पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने काही करात सवलत जाहीर केली होती.

या सवलतीत पुढील २  वर्षांसाठी १ टक्के मुद्रांक शुल्क सूट समाविष्ट आहे. यासह, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात कागदपत्रांच्या नोंदणीवर लागू असलेल्या इतर संबंधित शुल्कामध्ये सवलत देण्यात आली आहे.



हेही वाचा -

३० ते ४४ वयोगटाचं मोफत लसीकरण

बनावट ओळखपत्रावर लोकल प्रवास करत असाल तर सावधान!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा