देर आए पर दुरुस्त आए

 Masjid Bandar
देर आए पर दुरुस्त आए
देर आए पर दुरुस्त आए
See all

मस्जिद - भातबाजार परिसरातील गटाराचं झाकण अखेर बसवण्यात आलंय. गेल्या एक महिन्यांपासून गटाराचं झाकण तुटलं होतं. त्यामुळे गटार उघडच होतं. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. तसंच गटारात पाय अडकून अपघात होण्याचीही शक्यता होती. काळे ट्रांसपोर्ट सर्विसचे मालक मधुसूदन काळे यांनी यासंदर्भात पालिकेकडे तक्रार केली. पण पालिकेनं दुर्लक्ष केलं. मुंबई लाइव्हनं यासंदर्भातली बातमी दिली होती. त्यानंतर अखेर पालिकेला जाग आली. पालिकेनं गटाराचं झाकण उशीरा का होईना पण लावलंय.

Loading Comments