वडाळा - बरकतअली येथील नागरिकांची गैरसोय होतेय, ती तिथे असणाऱ्या शौचालयामुळे. येथील लक्ष्मण वाडी आणि सिद्धार्थनगर येथे असणाऱ्या ३ शौचालयाच्या दुरुस्तीचे काम २ ऑक्टोबरपासून सुरु केलंय. मात्र अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांची गैरसोय होतेय. विशेषतः महिलांची अधिक गैरसोय होतेय. याबाबत पालिकेचे परीक्षण आणि दुरुस्ती विभागाचे दुय्यम अभियंता अधिकरी सोहन आंचेलवार यांना विचारले असता, शौचालयाचे काम 3 महिने चालणार असल्याचं सांगितलं.