Advertisement

शौचालय दुरूस्तीच्या कामामुळे महिला त्रस्त


शौचालय दुरूस्तीच्या कामामुळे महिला त्रस्त
SHARES

घाटकोपर - घाटकोपरमधल्या एन वॉर्ड आफिसच्या तळमजल्यावरील महिला शौचालयाच्या दुरुस्तीच्या कामामुळे गैरसोय होते आहे. शौचालय दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे वॉर्डऑफिसमध्ये येणाऱ्या महिला तसंच इथल्या कर्मचाऱ्यांनाही तिसऱ्या मजल्यावरील शौचालयाचा वापर करावा लागतोय. विशेष म्हणजे हे काम 2 महिन्यांपासून सुरू असल्यानं महिला कर्मचारी हैराण आहेत. वॉर्ड ऑफिसमध्ये रोज विविध कामांसाठी विविध वयोगटातल्या महिला येतात. वृद्ध महिलांना याचा जास्त त्रास होतो. त्यामुळे शौचालयाचं काम अजून किती दिवस चालणार, असा प्रश्न महिलांना पडलाय. समाज विकास अधिकारी शुभा बेनुरवार यांनीही याचा त्रास सर्वच महिलांना होत असल्याचे मान्य केलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा