Advertisement

थर्टी फर्स्टला मुंबईत फटाकेबंदी?

रात्रीच्या वावरावर निर्बंध आणायचा विचार मुंबई महापालिकेकडून सुरू आहे. तसं झाल्यास थर्टी फर्स्टच्या निमित्ताने घराबाहेर पडून सेलिब्रेशन करण्यावर निर्बंध येऊ शकतो.

थर्टी फर्स्टला मुंबईत फटाकेबंदी?
SHARES

मुंबईतील कोरोना संसर्ग (coronavirus) अजूनही म्हणावा तसा आटोक्यात आलेला नाही. असं असतानाही मुंबईकर अत्यंत बेफिकीरीने वागत असल्याचं दिसून येत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वावरावर निर्बंध आणायचा विचार मुंबई महापालिकेकडून सुरू आहे. तसं झाल्यास थर्टी फर्स्टच्या निमित्ताने घराबाहेर पडून सेलिब्रेशन करण्याच्या वा फटाक्यांची आतषबाजी करण्याच्या विचारात असलेल्या मुंबईकरांना प्रशासनाकडून मनाई करण्यात येऊ शकते.

थर्टी फर्स्टच्या निमित्ताने मुंबईकर रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. अनेकाचं नववर्षाच्या सेलिब्रेशनचे प्लास आधीच तयार होतात. त्यानुसार कुटुंबकबिल्यासहीत किंवा मित्रमंडळींसोबत घर, सोसायटी परिसरात सेलिब्रेशन केलं जातं. नाचगाणं- खाण्यापिण्यासहीत फटाक्यांची आतषबाजी केली जाते. नाईट क्लब, पब, बार, रेस्टाॅरंटमध्ये गर्दी होते. काही मुंबईकर चौपाट्या, मरीन ड्राईव्ह, गेट वे आॅफ इंडिया अशा परिसरातही एकवटतात. परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी थर्टी फर्स्टच्या रात्री एकत्र येऊन सेलिब्रेशन करण्यावर निर्बंध येऊ शकतात. मुंबई महापालिका, पोलीस प्रशासनाने याबाबत अत्यंत सतर्क राहण्याचं ठरवलेलं आहे. 

हेही वाचा- मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करा, महापालिका आयुक्तांची मागणी

त्यातच मुंबई महापालिकेने (bmc) काही नाईट क्लबवर टाकलेल्या धाडीतून कोरोनासंदर्भातील नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचं आढळून आलं. एकाच ठिकाणी हजारोंच्या संख्येने जमलेल्या गर्दीत शारीरिक अंतराचा नियम न पाळणे, मास्क न घालणे असे प्रकार समोर आले. शिवाय इतर वेळेसही मुंबईकर गर्दी करताना दिसून येत आहेत. मास्क न घालता उघड्यावर वावरण्याचं प्रमाणही मुंबईकरांमध्ये वाढलं आहे. परिणामी कळत न कळतपणे कोरोना संसर्ग वाढत असल्याने उपनगरांमध्ये अजूनही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. या सर्व परिस्थितीकडे पाहता मुंबई महापालिका आयुक्तांनी सर्वांसाठी लोकल ट्रेन सुरू न करण्याचे संकेत देतानाच रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत मुंबईत कर्फ्यू लावण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. 

शिवाय मुंबई महापालिकेने हॉटेल, पब्ज, नाईट क्लबमध्ये होणाऱ्या गर्दीकडे लक्ष देण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे केली जात आहेत. प्रत्येक विभागाप्रमाणे २४ पथके तयार करण्यात येतील. गर्दी झाल्याची तक्रार येताच त्या ठिकाणी लगेच छापे टाकण्यात येतील. छापे टाकण्याचे अधिकार महापालिका सहाय्यक आयुक्तांकडे असतील. मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक विभागात २ पथक कार्यरत असतील. त्यात एक आरोग्य अधिकारी, अग्निशमन दलाचा आणि सुरक्षा दलातील प्रत्येकी एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. एखाद्या ठिकाणी नियमभंग झाल्याचं आढळून आल्यास संबंधितांवर महापालिकेकडून कडक कारवाई करण्यात येईल. 

(no thirty first celebration might in mumbai due to coronavirus pandemic)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा