Advertisement

मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करा, महापालिका आयुक्तांची मागणी

अनलॉकमध्ये मुंबईत निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळले जात नसल्याचं दिसून आलं आहे. परळ-बांद्रा येथील एका नाईट क्लबवर महापालिकेने धाड टाकल्यानंतर ही बाब पुन्हा एकदा समोर आली.

मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करा, महापालिका आयुक्तांची मागणी
SHARES

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी वापरताना नागरिकांनी काय काळजी घ्यावी याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. मात्र, मुंबईत नागरिक कोरोना नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करा अशी मागणी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी राज्य सरकारकडे केली आहे. 

अनलॉकमध्ये मुंबईत निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळले जात नसल्याचं दिसून आलं आहे. परळ-बांद्रा येथील एका नाईट क्लबवर महापालिकेने धाड टाकल्यानंतर ही बाब पुन्हा एकदा समोर आली.

महापालिकेने शहरातील इतरही नाईट क्लबवर धाडी टाकल्या आहेत. यावेळी, नाईट क्लबमध्ये हजारो लोक विनामास्क असल्याचं दिसून आलं. नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळत नसल्यामुळे आयुक्तानी राज्य सरकारकडे मुंबईत पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८७ हजार ८९८ वर गेली आहे. तर आतापर्यंत एकूण २ लाख ६४ हजार २२८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ११ हजार ९०३ जणांवर उपचार सुरु असून आतापर्यंत १० हजार ९२९ जणांचा कोरोमुळे मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा -

कोरोना लस : सरकार लाँच करणार Co-WIN अॅप

सावधान! वाहतुकीचे नियम मोडल्यास पोलीस रोख स्वरूपातही दंड वसूल करणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा