Advertisement

महापालिकेची विशेष पथकं ठेवणार नाईट क्लबवर नजर

कोरोना संदर्भातील नियमांचं नाईट क्लबकडून सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर मुंबईतील सर्व नाईट क्लबवर नजर ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे.

महापालिकेची विशेष पथकं ठेवणार नाईट क्लबवर नजर
SHARES

कोरोना संदर्भातील नियमांचं नाईट क्लबकडून सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर मुंबईतील (mumbai) सर्व नाईट क्लबवर नजर ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. हॉटेल, पब्ज, नाईट क्लबमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी काटेकोर मार्गदर्शक तत्त्वे केली जात आहेत. सोबतच प्रत्येक विभागानुसार २४ विशेष पथकं देखील तयार केली जाणार आहेत. 

अनलॉक मोहिमे अंतर्गत मुंबईतही लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल करताना कोरोनाचा (coronavirus) फैलाव होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी काय काळजी घ्यावी याच्या सूचना सरकारकडून सातत्याने केल्या जात आहेत.  तरीही, नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळले जात नसल्याचं दिसून येत आहे. परळ-वांद्रे येथील नाईट क्लबवर महापालिकेने धाड टाकल्यानंतर ही बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. यावरून भाजपकडून सरकारवर टीका देखील करण्यात आली.

हेही वाचा- पब, बार गँग मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठी?- भाजप

महापालिकेने (bmc) शहरातील इतरही नाईट क्लबवर धाडी टाकल्या आहेत. यावेळी, नाईट क्लबमध्ये हजारो लोकं विनामास्क असल्याचं दिसून आलं. या ठिकाणी प्रचंड गर्दी देखील होती कोणत्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये याकरिता केवळ ५० लोकांनाच परवनागी दिली जाते. ही परवानगी देताना सामाजिक अंतराचा नियम पाळण्याचे व सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणंही बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र मुंबईतील ‘नाईट क्लब’मध्ये हे सर्व नियम धुडकावून लावले जात आहेत. हे क्लब पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू असतात. 

शिवाय इतरही नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळत नसल्यामुळे मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी राज्य सरकारकडे मुंबईत पुन्हा एकदा रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्याची लेखी मागणी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने हॉटेल, पब्ज, नाईट क्लबमध्ये होणाऱ्या गर्दीकडे लक्ष देण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे केली जात आहेत. प्रत्येक विभागाप्रमाणे २४ पथके तयार करण्यात येतील. गर्दी झाल्याची तक्रार येताच त्या ठिकाणी लगेच छापे टाकण्यात येतील. छापे टाकण्याचे अधिकार महापालिका सहाय्यक आयुक्तांकडे असतील. मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक विभागात २ पथक कार्यरत असतील. त्यात एक आरोग्य अधिकारी, अग्निशमन दलाचा आणि सुरक्षा दलातील प्रत्येकी एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. एखाद्या ठिकाणी नियमभंग झाल्याचं आढळून आल्यास संबंधितांवर महापालिकेकडून कडक कारवाई करण्यात येईल. 

(bmc making strict guidelines for night club pub and bars in mumbai to avoid coronavirus spread)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा