Advertisement

पब, बार गँग मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठी?- भाजप

मुंबईकरांकडून रात्रीच्या वेळेस कोरोना निर्बंधांचं पालन होत नसल्याने मुंबईत रात्री संचारबंदी लागू करावी, अशी शिफारस मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नुकतीच राज्य सरकारकडे केली आहे.

पब, बार गँग मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठी?- भाजप
SHARES

मुंबईकरांकडून रात्रीच्या वेळेस कोरोना निर्बंधांचं पालन होत नसल्याने मुंबईत रात्री संचारबंदी लागू करावी, अशी शिफारस मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नुकतीच राज्य सरकारकडे केली आहे. यावरून भाजप नेते आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.

बार, पब मुळे कोरोना वाढला.. आता नशा उतरली..? महापालिकेला नाईट कर्फ्यू लावायची वेळ आली. पब, पार्टी गँगने वेळ वाढवून मागितली होती… या गँगला आता जबाबदार धरणार का? मुख्यमंत्री आरोग्याचं आवाहन करतात..तर पब, पार्टी गँग अनधिकृतपणे धिंगाणा घालतात! ही गँग मुख्यमंत्र्यापेक्षा मोठी आहे का?, असा प्रश्न आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

हेही वाचा- मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करा, महापालिका आयुक्तांची मागणी

अनलॉक मोहिमे अंतर्गत मुंबईतही लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले. निर्बंध शिथिल करताना कोरोनाचा (coronavirus) फैलाव होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी काय काळजी घ्यावी याच्या सूचना सरकारकडून सातत्याने केल्या जात आहेत.  तरीही, नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळले जात नसल्याचं दिसून येत आहे. परळ-वांद्रे येथील एका नाईट क्लबवर महापालिकेने धाड टाकल्यानंतर ही बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.

महापालिकेने शहरातील इतरही नाईट क्लबवर धाडी टाकल्या आहेत. यावेळी, नाईट क्लबमध्ये हजारो लोकं विनामास्क असल्याचं दिसून आलं. कोणत्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये याकरिता केवळ ५० लोकांनाच परवनागी दिली जाते. ही परवानगी देताना सामाजिक अंतराचा नियम पाळण्याचे व सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणंही बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र मुंबईतील ‘नाईट क्लब’मध्ये हे सर्व नियम धुडकावून लावले जात आहेत. हे क्लब पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू असतात. 

शिवाय इतरही नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळत नसल्यामुळे आयुक्तानी राज्य सरकारकडे मुंबईत पुन्हा एकदा रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्याची लेखी मागणी केली आहे.

(bjp leader ashish shelar slams bmc and thackeray government over night clubs bars during coronavirus pandemic)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा